काळे डाग असलेल्या केळीचे आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:19 PM2018-07-23T14:19:16+5:302018-07-23T14:19:38+5:30

केळी पिकल्यानंतर त्यात अॅंटीऑक्सीडेंट तत्वांचं प्रमाणही वाढतं. वजन वाढवण्यासाठी केळी महत्वाच्या ठरतात. 

Amazing health benefits of eating black spots banana | काळे डाग असलेल्या केळीचे आरोग्यदायी फायदे!

काळे डाग असलेल्या केळीचे आरोग्यदायी फायदे!

Next

अनेकजण केळी घ्यायला गेल्यावर काळे डाग असलेल्या केळी घेत नाहीत. काळे डाग असलेल्या केळी खराब झाल्या असं त्यांना वाटत असतं. पण असं अजिबात नाहीये. काळे डाग असलेल्या केळी खाल्याच अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काळे डाग असलेल्या केळी पूर्णपणे पिकलेल्या असतात. केळी पिकल्यानंतर त्यात अॅंटीऑक्सीडेंट तत्वांचं प्रमाणही वाढतं. वजन वाढवण्यासाठी केळी महत्वाच्या ठरतात. 

केळींमध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतरही काही आवश्यक पोषक तत्व आहेत. केळीमद्ये एफओऐस तत्व आढळतात जे पोटांचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात. चला जाणून घेऊ पिकलेल्या केळीचे फायदे....

१) कॅन्सरशी लढण्यासाठी

जपानी संशोधकांनुसार ज्या केळींवर काळे डाग असतात ते अधिक आरोग्यदायी असतात. अमेझिंग स्टोरीज अराऊंड द वर्ल्ड नावाच्या शोधपत्रानुसार, द्राक्ष, सफरचंद, कलिंगड, अननस या फळांच्या तुलनेत केळींमध्ये सर्वात जास्त अॅंटी कॅन्सर तत्व असतात. 

२) रोकप्रतिकारशक्ती वाढते

कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळींमध्ये अधिक असते. केळींवर जितके जास्त काळे डाग असतात ते रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसीत करतात. 

३) ऊर्जेचा स्त्रोत

केळींमध्ये नैसर्गिक शुगर असते. शारीरिक श्रम केल्यानंतर केळीचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमीत केळी खाव्यात. 

४) पचनक्रिया राहते चांगली

पिकलेली केळी पटनाला सोपी असते. केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ते पचनक्रिया सुधारते. 

५) तोंडाची फोडं दूर करण्यासाठी

ज्या लोकांना सतत तोंडाला फोडं येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय आहे. तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावीत. 

६) तणाव होतो कमी

केळींमध्ये ट्रायप्टोफान नावाचं एमिनो अॅसिड असतं जे तणाव कमी करतं. केळी शरीरातील सेरोटोनिनचं प्रमाण वाढवतात. ज्याने मूड चांगला राहतो. 
 

Web Title: Amazing health benefits of eating black spots banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.