आपल्यापैकी अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. बरेच प्रयत्न करूनही वजन कमी करणं शक्य होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असण्यासोबतच व्यायामाचे नियोजन करणंही आवश्यक असतं. पण याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपलं वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

अनेकदा वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आहारात उकडेल्या पालेभाज्या, ग्रीन टी यांसारख्या पदार्थांचा समावेश करतो. परंतु आपल्या जीभेला या पदार्थांची चव काही रूचत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? काही पदार्थ खाण्याऐवजी त्यांचा गंध घेतल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. काही रिसर्चमधून स्पष्ट झाल्यानुसार काही पदार्थ असे असतात, ज्यांचा फक्त गंधच आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया अशा 7 पदार्थांबाबत जे तुम्हाला वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. 

पेपरमिंट ऑइल :

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, पेपरमिंट ऑइलचा गंध घेतल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्या आत्मविश्वासातही भर पडते. यासाठी पेपरमिंट ऑइलमधील गुणधर्म ट्रायजेमिनल नर्वला उत्तेजित करण्यासाठी उपयोगी ठरतात. पेपरमिंट ऑइलचा गंध घेतल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. जेव्हाही तुम्हाला थकल्यासारखे वाटेल त्यावेळी पेपरमिंट ऑइलचा गंध घेतल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. एवढेच नाही तर शरीरातील मेटाबॉलिझम आणि ऊर्जा वाढविण्यासाठी पेपेरमिंट ऑइल फायदेशीर ठरतं. 

हिरवं सफरचंद आणि केळी :

स्मेल अॅन्ड टेस्ट ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च फाउंडेशनने केलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, वजन वाढलेल्या व्यक्तींनी भूक लागल्यावर जर हिरवं सफरचंद आणि केळी यांचा गंध घेतला तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते. या फळांना असणारा नैसर्गिक गोड गंध भूक भागवण्यासाठी मदत करतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. जर तुमच्याकडे हिरवं सफरचंद किंवा केळी नसतील तर व्हेनिला स्टिक्स किंवा इसेंन्स फायदेशीर ठरेल. 

पपनस :

चवीला आंबट असणारे हे फळ बऱ्याचजणांना आवडतं. एका संशोधनातून सांगण्यात आलं आहे की, जर खाण्याआधी या फळांचा गंध घेतला तर तुमचं वजन कमी करण्यासाठी हे मदत करतं. ओसाका यूनिवर्सिटीतील संशोधकांनी अभ्यासासाठी एका उंदरावर हा प्रयोग केला होता. त्यांनी भूक लागलेल्या उंदराला पपनस फळाचा गंध दिला असता कालांतराने त्या उंदराचे वजन कमी झाल्याचे निदर्शनास आले. वजन कमी होण्याची क्रिया लिव्हर एंजाइम आणि गंध यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेवर अवलंबून असते.

लसूण :

2012मध्ये फ्लेवर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एखाद्या पदार्थाला उग्र गंध येत असेल तर कोणतीही व्यक्ती त्या पदार्थाचा छोटा घास घेते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बोल्ड फ्लेवर्स आणि उग्र गंध असणारे मसालेदार पदार्थ फायदेशीर ठरतात. लसणाशिवायही अनेक मसाल्याचे पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. 

ऑलिव्ह ऑइल :

जर्मन रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑईलचा गंध घेतल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. दह्यामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्याचा आहारात समावेश केला तर त्यामुळे शरीराला कमी कॅलरीज मिळतात तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑइलमध्ये चांगले फॅट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे बेली फॅट्स कमी होण्यास मदत होते.

बडीशेप :

वेस्ट कोस्ट इंस्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, कुरकुरीत आणि ताज्या रोपांचा गंध भूक भागविण्याचे काम करतो. 


Web Title: 6 smells that can help you lose weight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.