चेह-याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आंब्याचे हे 6 फायदे माहीत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 11:21 AM2018-04-03T11:21:27+5:302018-04-03T11:32:31+5:30

आंब्याचा सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयोग होतो हे क्वचितच लोकांना माहीत असेल. चला जाणून घेऊया आंब्याचे असेच काही फायदे..... 

5 amazing benefits of mangoes to glow your face | चेह-याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आंब्याचे हे 6 फायदे माहीत आहे?

चेह-याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आंब्याचे हे 6 फायदे माहीत आहे?

Next

मुंबई : नुकताच आंब्याचा सीझन सुरु झालाय आणि आंब्यावर ताव मारण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. कसंय ना? नुसतं आंब्याचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे अगदी हात आणि तोंड भरवून खाणं कुणालाही आवडतं. आंब्याच्या वेगवेगळ्या जाती अनेकांना माहिती आहेत. पण आंब्याचा सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयोग होतो हे क्वचितच लोकांना माहिती असेल. चला जाणून घेऊया आंब्याचे असेच काही फायदे..... 

आंब्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनते. तसेच आंब्यांचा गर (पल्प) चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स हे सर्व नाहीसे होतात. 

1) स्क्रब

एक चमचा आंब्याचा गर, मध, त्यात अर्धा चमचा दूध किंवा मिल्क पावडर घालून चेहऱ्यावर लावा. त्वचा आणखी चमकदार दिसेल आणि डोळ्याखालील डार्क सर्कल निघून जातात.

2) फेस पॅक

आंब्याच्या सालीचाही सौंदर्य खुलवण्यासाठी फायदा होतो. अनेकजण आंबा खाल्ल्यानंतर आंब्याची साल फेकून देतात. पण त्या सालींचा फेस पॅक बनवला जाऊ शकतो. त्या साली उन्हात सुकवून त्यात दही घालून फेस पॅक बनवता येतो. या फेस पॅकने तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, काळे डाग निघून जातील.

3) कच्च्या आंब्याचा रस

कच्च्या आंब्याचे तुकडे करुन पाण्यात उकळवा. आणि ते पाणी रोज चेहऱ्यावर लावा किंवा त्या पाण्याने दिवसातून दोनदा चेहरा धुतला तर चेहऱ्यावरचे पिंपल्स दूर व्हायला मदत होते.

4) क्लिन्जर

एक चमचा गव्हाचं पीठ आणि त्यात आंब्याचा रस घालून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा साफ होण्यास मदत होते.

5) टॅनिंग

कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याची सालं हातावर आणि पायावर घासून त्यावर दुधावरची साय लावायची आणि १५ मिनट थांबून थंड पाण्याने धुवून घ्यायचं... असं केल्याने टॅनिंग दूर होते.
 

Web Title: 5 amazing benefits of mangoes to glow your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.