भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक : ३ ठार, दोन जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 08:39 PM2018-01-24T20:39:32+5:302018-01-24T20:39:56+5:30

भरधान ट्रकने समोरुन येणा-या दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली. 

Two people were killed in the truck, three were killed and two were seriously injured | भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक : ३ ठार, दोन जण गंभीर 

भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक : ३ ठार, दोन जण गंभीर 

Next

  गोंदिया - भरधान ट्रकने समोरुन येणा-या दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली. 
नरेश वामन वालदे (३५), मंगेश प्रभु मेश्राम (३२) रा. चिखली व एका अनोळखी इसमाचा मृतकामध्ये समावेश आहे. तर शिशुला वामन वालदे, भूमेश्वर विलास वालदे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यींची नावे आहेत. जखमींना सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार कोहमा-याकडून गोंदियाकडे येणाºया ट्रक क्रमांक एम.एच- ३५, के २६२१ ने समोरुन येणा-या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्यावरील दोन विद्युत खांबाना धडक दिली. यामुळे विद्युत तारा तुटल्या असून चिखली गावातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे.
दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या गावक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. अपघातात ठार झालेल्या तिघांपैकी एकाची ओळख पटली नसून त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवर जागेश्वर चुटे असे लिहिले असल्याची माहिती आहे. दरम्यान डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळावर पोहचत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two people were killed in the truck, three were killed and two were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.