पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:11 AM2018-04-15T00:11:12+5:302018-04-15T00:11:12+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि त्यांना पुरेशा प्रमाणात शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याला आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Top priority to drinking water | पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्री बडोले : मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि त्यांना पुरेशा प्रमाणात शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याला आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेतील दत्तक घेतलेल्या वडेगाव-सडक येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे भूमिपूजन बडोले यांनी केले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच हेमराज खोटेले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेगावकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे उपस्थित होते.
बडोले म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी योजनेची आवश्यकता आहे. अशा गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी देखील खालावत आहे.त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता ग्रामस्थांनी घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
परशुरामकर म्हणाले, शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. परंतू योजना राबवितांना यंत्रणा कमी पडत आहे. लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली तर नक्कीच त्या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळू शकते असे सांगितले. सोनवणे म्हणाल्या, गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारी ही उपयुक्त योजना आहे.
ही योजना या गावांमध्ये यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले. ही योजना पूर्ण होताच ग्रामस्थांना नियमीत शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजना पूर्ण होताच गावकऱ्यांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
भविष्यकालीन नियोजन
वडेगाव येथे २०३३ ची लोकसंख्या गृहीत धरु न ४८३ कुटूंबांसाठी प्रती व्यक्ती ४० लिटर याप्रमाणे १ लक्ष ८ हजार ६८० लिटर प्रती दिन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेवर ५७ लाख ५७ हजार ४५० रु पये खर्च होणार आहे. तालुक्यातील वडेगाव (सडक), खजरी (डोंगरगाव), डोंगरगाव (खजरी), कोहळीटोला(आदर्श), डव्वा, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तयार करण्यात येणाºया पाणी पुरवठा योजनेचे भमिपूजन करण्यात आले.

Web Title: Top priority to drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.