अध्ययनस्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:11 AM2018-12-22T01:11:47+5:302018-12-22T01:16:21+5:30

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययनस्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला केंद्र प्रमुख एन.बी.कटरे यांनी दिला.

Teachers should try to increase the level of study | अध्ययनस्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे

अध्ययनस्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे

Next
ठळक मुद्दे एन.बी.कटरे : नंगपुरा मुर्री येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययनस्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला केंद्र प्रमुख एन.बी.कटरे यांनी दिला.
शासकीय आश्रम शाळा नंगरपूरा (मुर्री) येथे आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता हायस्कुल चुटियाचे मुख्याध्यापक एन.के.शेंडे हे होते. या वेळी मुख्याध्यापिका उमा उके, छाया कोसरकर, अल्का चित्रिव, शिवाणी अग्रवाल, मुख्याध्यापक व्ही.एस. हसबन, आर. बी. बाचकवार व मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन करण्यात आली. मुर्रीच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर निश्चिती करण्याची गरज काय? डिजीटल व शैक्षणिक साहित्यांचा दैनदिन अध्यापनात वापर, मुल्य संवर्धन, भाषा संबोध, गणित संबोध, दप्तराचे ओझे कमी करणे, स्वच्छता व मोकळीका यावर सविस्तर मार्गदर्शन साधन व्यक्ती विनोद परतेती, ज्योती पारधी, तज्ज्ञ मार्गदर्शक के.आर. गोटेफोडे, एल. यू. खोब्रागडे, के.जे.बिसेन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन जी.एस. कोसलकर तर आभार एम.डी.फड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एल.एस.मरकाम, आर.जी.हुमणे, एम.आर.वाटमोडे, नागसेन भालेराव, ओ.एल.नंदनवार, एस.बी.पटले, एम.ए. बागडे, डी. आय. खोब्रागडे, सोनवाने, अजय कावळे, वर्षा कोसरकर, पूजा चौरसिया, के.एस.होरे, चौरे, वालदे, वैद्य, अवस्थी, ठाकरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Teachers should try to increase the level of study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक