बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:10 AM2018-08-04T00:10:53+5:302018-08-04T00:12:15+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.

Taking the case of the teacher, Elgar | बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार

बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांत रोष : शिक्षण संघटनेच्या उपोषणाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग जिल्ह्यातील शाळांची स्थिती व शिक्षकांचे समायोजन याची पुरेपूर माहिती पुरविण्यात अपयशी ठरल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक त्रुट्या निर्माण झाल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याचे कारण पुढे करुन समता संग्राम परिषद व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने या अन्यायाविरोधात गुरूवारपासून (दि.२) पासून जिल्हा परिषद कार्यालयासोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरवर्षी स्थानिकस्तरावर शिक्षक स्थानांतरण प्रक्रियेमध्ये होणारा घोळ थांबविण्यासाठी यावर्षी राज्य शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने आॅनलाईन पद्धतीने स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला. आॅनलाईन पद्धतीमध्ये स्थानांतरणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांना वैयक्तिक सेवा काळाची माहिती भरणे होते. याबाबत सर्व तपासणी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयाची होती. त्याचबरोबर शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची पदस्थापना विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर पदे या सर्व बाबतची माहिती पुरविली होती. मात्र शिक्षक आणि जिल्हा परिषद यंत्रणेकडून जवाबदारीने कार्य करण्यात आले नाही.
त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत घोळ निर्माण झाला. ही बाब शिक्षकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र ही बाब आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगून शिक्षण विभाग हात झटकत आहे. यामुळे झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. यांतर्गत गुरूवारपासून (दि.२) जिल्हा परिषद कार्यालयासमोर समता संग्राम परिषद व कास्ट्राईब शिक्षक संघाच्यावतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे.
उपोषणाला सतीश बन्सोड, विनोद मेश्राम, दिलीप मेश्राम, विजय सूर्यवंशी, एस.यू.वंजारी, आर.एम. बोपचे, मनोज गणवीर, सिद्धार्थ ठवरे, विनोद हुकरे, रामकृष्ण चौरागडे, सुरेश पटले, ए.के. बिसेन, एन.एस. भुरे, आर.एस. चौधरी, जे.एस. बावीसकर, डी.एल. साखरकर यासह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये एक युनिटचा बदली अर्ज करुनसुद्धा पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ न मिळालेल्या शिक्षकांना तो लाभ देण्यात यावा. विस्थापित झालेल्या पती-पत्नी व एकल शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, खोटी माहिती देवून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, विस्थापित रँडम राऊंडनुसार पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांना समानीकरणाच्या जागा मोकळ्या करुन पसंती क्रमानुसार देण्याची कारवाई करण्यात यावी. विस्थापित झालेल्या शिक्षकांना रँडम राऊंड मधील पदस्थापना देण्यात यावी. तक्रार निवारण समिती स्थापन करुन शिक्षकांच्या मागण्यांचे निराकरण करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Taking the case of the teacher, Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.