अल्पवयीन मुले अश्लील साईटच्या आहारी

By Admin | Published: June 29, 2014 11:57 PM2014-06-29T23:57:20+5:302014-06-29T23:57:20+5:30

आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावध व्हा. कारण, ते पोर्न वेबसाईट्सच्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी

Supplement of minor children porn sites | अल्पवयीन मुले अश्लील साईटच्या आहारी

अल्पवयीन मुले अश्लील साईटच्या आहारी

googlenewsNext

नरेश रहिले - गोंदिया
आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावध व्हा. कारण, ते पोर्न वेबसाईट्सच्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईट्स पाहत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत आहेत. ही धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात अल्पवयीनांचे बाल्यपण हरवत आहे.
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात गोंदिया जिल्ह्यात १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहिती प्रमाणे, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत. तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कदायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.
गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैनी थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. बालवयात चांगले संस्कार रूजविण्याच्या वेळात बालके पोर्न साईड्सच्या आहारी जात असल्याने सुसंस्कारा ऐवजी कुसंस्कारीतपणा मुलांच्या अंगी येत असल्याचे चित्र मुख्यत: शहराच्या ठिकाणी जास्त दिसून येत आहे.

Web Title: Supplement of minor children porn sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.