वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:22 PM2019-05-03T21:22:46+5:302019-05-03T21:23:31+5:30

जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे.

Storm and rain damages 11 lakh | वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

Next
ठळक मुद्देतीन तालुक्यांना फटका : सर्वाधिक नुक सान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यात सर्वाधीक नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात नोंदविण्यात आले आहे.
सुर्य आग ओकून सर्वांना भाजून सोडत असताना गुरूवारी (दि.२) अचानकच जिल्ह्यात चक्रीवादळ व पावसाने हजेरी लावून चांगलेच झोडपून काढले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राजोली, भरनोली व गोठणगाव परिसरात कहरच केला. सायंकाळी वादळ वारा व गारपीटीसह बरसलेल्या पावसाने मालमत्तेचे नुकसान केले असतानाच उन्हाळी धानालाही झोडपले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४५ घर व गोठे पडले असून यात चार लाख ३५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वादळ व पावसाने अर्जुनी-मोरगावसह देवरी व सालेकसा तालुक्यालाही झोडपले. देवरी तालुक्यात वादळी वारा व पावसाने ४३ घरांचे अंशत: नुकसान झाले असून त्याची एक लाख ५६ हजार ५०० रूपये एवढी नोंद करण्यात आली आहे. तर सालेकसा तालुक्यात वादळाने एक घर पूर्णत: पडले असून ३७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात चार लाख १५ हजार रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अशाप्रकारे गुरूवारच्या वादळ व पावसाने जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Storm and rain damages 11 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस