प्रशासनाच्या संवेदना झाल्या बोथट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:31 AM2019-02-03T00:31:55+5:302019-02-03T00:32:33+5:30

तालुक्यातील भंडगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसला आहे. कोमलप्रसादने आपल्या चार मागण्यांना घेवून २५ जानेवारीपासून गोरेगावच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.

The sensation of the administration was inconceivable | प्रशासनाच्या संवेदना झाल्या बोथट

प्रशासनाच्या संवेदना झाल्या बोथट

Next
ठळक मुद्देनऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील भंडगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसला आहे. कोमलप्रसादने आपल्या चार मागण्यांना घेवून २५ जानेवारीपासून गोरेगावच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. पण नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्याच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून आमरण उपोषण सुरु केले होते. त्याला २९ जानेवारीला प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करुन गोंदिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे कोमलप्रसादने डॉक्टरांना उपचार घेण्यास मनाई करीत आंदोलन सुरुच ठेवले. १ फेब्रुवारीला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी नागपूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. कोमलप्रसादला १ फेब्रुवारीला रात्री २ वाजता नागपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मागील नऊ दिवसांपासून कोमलप्रसाद कटरे आमरण उपोषणावर असताना एकाही लोकप्रतिनिधींनी कोमलप्रसादची साधी भेट घेण्याचे औदार्य दाखविले नाही. लोकांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे काम लोकप्रतिनिधीचे राहते. पण इथे नेमके याविरुध्द चित्र आहे.

Web Title: The sensation of the administration was inconceivable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप