गाव झाले आदर्श आता दूर व्हावी सिंचनाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:54 PM2019-04-27T21:54:55+5:302019-04-27T21:55:41+5:30

तालुक्यातील ३८०० लोकवस्तीचे पाथरी गाव म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या येथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती.

The problem of irrigation is to be removed from the village | गाव झाले आदर्श आता दूर व्हावी सिंचनाची समस्या

गाव झाले आदर्श आता दूर व्हावी सिंचनाची समस्या

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । पाथरीचा बदलला चेहरा मोहरा । खासदार दत्तक गाव, आत्तापर्यंत ७ कोटीचा निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील ३८०० लोकवस्तीचे पाथरी गाव म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या येथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकºयांनाही विकासाची स्वप्न पडू लागली.अल्पावधीत गावात झालेल्या विकास कामांमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला व आदर्श गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली.
पाथरी गावात सर्वच जाती धर्माचे लोक राहतात.गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच सामोपचाराने मिटविले जातात. बहुतांश लोक शेतीवर उपजिविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेत जमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजिविकेसाठी गाव सोडून जावे लागले. आता ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना येथे कटंगी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची मोठी आस आहे.कटंगी व प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकºयांना मिळू शकत नाही. ही येथील गावकºयांची सर्वात मोठी खंत आहे. हे गाव आणि लगतच्या शेत जमिनी उंच आहे. तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करुन (उपसा सिंचन योजना ) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे,अशी गावकºयांची अपेक्षा आहे. शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रब्बी हंगामातही धानाचे पीक घेऊन संपन्न होतील. पाथरी गावाला खा.प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतल्यापासून आजपर्यंत सात कोटी ६३ लाख रुपयांचे विविध योजनेतील विकासकामे करण्यात आली. बस स्टँंड, सपाटीकरण, सौंदर्यीकरण, व्यायाम शाळा, रस्ते, नाली, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्य स्वच्छतेवर खर्च करण्यात आले.
उपसा सिंचन, क्रीडांगण, व्यायाम शाळा साहित्य व इतर विकास कामासाठी पाच कोटी रुपयांची मागणी आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी एक कि.मी.अंतरावर असलेल्या कुºहाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुºहाडीत आहे.एक कि.मी.चे अंतर पार करताना गावकºयांना कोणतीही अडचण नाही.
खा. प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकºयांचा आशा पल्लवित झाल्या आहेत.

गावाचा कायापालट झाला. सर्व सोई सवलती, शासकीय योजनांचा लाभ मिळाला. रस्ते, नाल्या चकचकीत झाल्या, स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागृती आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या गावाला दत्तक घेवून पाथरीवासियांच्या हृदयाला साद दिली.
- ज्ञानेश्वर शहारे,
नागरिक, पाथरी.

Web Title: The problem of irrigation is to be removed from the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.