पीक विम्याने वाढविले कृषी विभागाचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:03 AM2017-07-29T01:03:05+5:302017-07-29T01:03:32+5:30

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेवटे तीन दिवस उरले आहेत.

paika-vaimayaanae-vaadhavailae-karsai-vaibhaagaacae-taensana | पीक विम्याने वाढविले कृषी विभागाचे टेंशन

पीक विम्याने वाढविले कृषी विभागाचे टेंशन

googlenewsNext
ठळक मुद्दे उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाºयांना टार्गेट : उरले केवळ तीन दिवस

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेवटे तीन दिवस उरले आहेत. परंतु, शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कृषी विभागाचे टेशंन वाढले आहे. आता उद्दिष्ट पूर्तीसाठी कर्मचाºयांना टार्गेट दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गेल्या तीन चार वर्षांपासून पिकांचा विमा काढल्यानंतरही शेतकºयांना त्याचा फारसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पीक विम्याच्या हप्त्यापोटी विमा कंपनीकडे १० कोटी रुपयांचा निधी जमा केला. मात्र मागीलवर्षी नुकसान होऊन देखील विमा कंपन्यानी जिल्ह्यातील केवळ ९० शेतकºयांना मदतीस पात्र ठरवित १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे पीक विमा काढण्यास यंदा शेतकरी तयार होत नसल्याचे चित्र आहे. आधी कर्जमाफीवरुन निर्माण झालेला घोळ आणि त्यामुळे पीक कर्ज वाटप करण्यास विलंब झाला. त्यामुळे आज २८ जुलैपर्यंत २५ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार शेतकरी आहेत. यापैकी ६० हजार शेतकरी कर्जदार आहेत.
कर्जदार शेतकºयांना पीक विमा काढणे अनिवार्य आहे. तर गैरकर्जदार शेतकºयांना पीक विमा काढणे अनिवार्य नाही. पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. आत्तापर्यंत केवळ २५ हजार कर्जदार शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. एकूण शेतकºयांचीे संख्या लक्षात घेता हा आकडा फारच कमी आहे. तर शासनाने यंदा जास्तीत जास्त पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले. शिवाय मागील वर्षीपेक्षा जास्त पीक विम्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे टार्गेट दिल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाºयांची बैठक घेऊन यावरुन त्यांना फटकारल्याची माहिती आहे. त्यामुळेच पीक विमा काढण्याची अंतीम मुदतीस केवळ तीन दिवस शिल्लक असून ऐवढ्या कमी कालावधीत हे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार अशी चिंता सतावित असल्याचे चित्र आहे.

प्रती कर्मचारी १०० अर्जाचे टार्गेट
पीक विम्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात गोंदिया जिल्हा फारच मागे आहे. त्यातच पीक विमा काढण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. तीन दिवसात जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहचून पीक विम्याचे उद्दिष्ट गाठता यावे, कृषी विभागाने प्रती कर्मचारी शंभर पीक विम्याचे अर्ज भरुन आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या संदर्भातील सूचना कर्मचाºयांन आज शुक्रवारी मोबाईलवरुन मिळताच त्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे.
कागदपत्रांनी फोडला शेतकºयांना घाम
पीक कर्जाची उचल आणि पीक विमा काढण्यासाठी शासनाने काही कागदेपत्रे जोडणे अनिवार्य केले. आधारकार्ड, सातबारा, गाव नमुना आठ, पीक पेरा प्रमाणपत्र, शंभर रुपयांच्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र यांचा समावेश आहे. रोवणीची कामे सांभाळून या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकºयांना चांगलाच घाम फुटत आहे.
रविवारी जिल्ह्यातील बँका सुरू
३१ जुलै ही पीक विमा काढण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तीन दिवसात अधिकाधिक शेतकºयांना पीक विमा काढता यावा. यासाठी रविवारी जिल्ह्यातील जिल्हा आणि राष्टÑीयकृत बँकेच्या सर्व १३१ शाखा सुरू राहणार आहेत. त्यासंबंधीचे निर्देश देखील शासनाकडून बँकाना प्राप्त झाल्याची माहिती आहे.

१३१ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २५ हजार ३३३ शेतकºयांना ९४ कोटी ४३ लाख कोटी तर राष्टÑीयकृत बँकेतर्फे ३६ कोटी ३ लाख अशा एकूण १३१ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप शेतकºयांना करण्यात आले आहे. यंदा जिल्हा आणि राष्टÑीयकृत बँकाना खरीपात २३० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

Web Title: paika-vaimayaanae-vaadhavailae-karsai-vaibhaagaacae-taensana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.