उत्पादक व वितरकांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:09 PM2018-06-27T22:09:32+5:302018-06-27T22:10:37+5:30

राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्यानंतर त्याची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गोंदिया नगर परिषदेनेही प्लास्टीक वस्तूंचे उत्पादक व वितरकांवर कारवाईचा श्री गणेश केला आहे. नगर परिषदेने शहरातील ३६ उत्पादक व वितरकांना नोटीस बजावली आहे. प्लास्टीक पिशव्यांची विक्रीे करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Notices issued to manufacturers and distributors | उत्पादक व वितरकांना बजावली नोटीस

उत्पादक व वितरकांना बजावली नोटीस

Next
ठळक मुद्देप्लास्टिकबंदीची अंमलबजावणी : नगर परिषदेची कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्यानंतर त्याची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गोंदिया नगर परिषदेनेही प्लास्टीक वस्तूंचे उत्पादक व वितरकांवर कारवाईचा श्री गणेश केला आहे. नगर परिषदेने शहरातील ३६ उत्पादक व वितरकांना नोटीस बजावली आहे. प्लास्टीक पिशव्यांची विक्रीे करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर शहरवासीयांनी सुध्दा प्लास्टीक बंदीची धडकी घेतली आहे.
शासनाने प्लास्टिकबंदीचे आदेश यापूर्वी अनेकदा काढले होत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी बंदी नंतरही प्लास्टीक वस्तूंचा वापर सर्रास सुरूच होता. मात्र उच्च न्यायालय व राज्य शासनाने २३ जूनला काढलेल्या आदेशानंतर आता यात काही पळवाट दिसत नसल्याने प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्लास्टिकबंदीच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच नगर परिषदांनी त्यांच्या हद्दीतील प्लास्टिक वस्तूंचे उत्पादक व वितरकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. या कारवाईतून नगर परिषदेला दंड स्वरुपात महसूल सुध्दा मिळत आहे. गोंदिया नगर परिषद कामाला लागली असून सोमवारी (दि.२५) नगर परिषदेच्या पथकाने शहरातील चार प्लास्टिक वितरकांवर कारवाई करून त्यांना २० हजार रूपयांचा दंड ठोठावला. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच शहरातील ३६ प्लास्टिक उत्पादक व वितरकांना नोटीस बजावले आहे. त्यानंतर आता कारवाईचे सत्र सुरू केल्याने शहरातील प्लास्टिक उत्पादक व वितरकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कारवाई नियमित होत राहणार- पाटील
प्लास्टिकबंदीबाबत नगर परिषदेने कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई नियमीत सुरू राहणार आहे. नगर परिषदेने यापूर्वीही प्लास्टिकबंदीची कारवाई केली असता त्यात काही व्यापाऱ्यांकडून अडथळा निर्माण करण्यात आला होता. आता मात्र असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. कुणीही अडथळा निर्माण केल्यास त्वरीत नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व शहरवासीयांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
दुकानदारांकडून स्वेच्छेने सहकार्य
प्लास्टिकचा वाढता वापर निसर्ग व सजीव सृष्टीवर कसा नुकसानकारक ठरत आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीच्या या लढ्यात शहरातील काही दुकानदारांनी सहकार्य देत स्वेच्छेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला आहे. दुकानदार ग्राहकांना सामान नेण्यासाठी आता प्लास्टिक पिशव्या देत नसून उलट आता कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

Web Title: Notices issued to manufacturers and distributors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.