बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:23 AM2018-03-04T00:23:18+5:302018-03-04T00:23:18+5:30

बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत.

The need of the Bahujan Samaj to get organized | बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

Next
ठळक मुद्देनाना पटोले : गंगा जमुना देवस्थानात स्रेहमिलन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत. धार्मिकतेची तशीच राजकीय कारकीर्दीची नाळ गावासोबत जोडली जात आहे. गावचे पावित्र्य कायम ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याची परंपरा वाढीस लागणार नाही. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून गाव एकसंघ करुन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर लक्ष केंद्रीत न करता बहुजन समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित होणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
येथील मॉ गंगा जमुना देवस्थानच्यावतीने देवस्थान परिसरात परंपरेनुसार चालत असलेल्या गावातील सर्वधर्म समभाव चहापान व होळीमिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ. शामकांत नेवारे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, आनंदकुमार जांभुळकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष तुळशीदास बोरकर, नित्यानंद पालीवाल, मोरेश्वर बनपूरकर, माजी सरपंच रामकृष्ण मेश्राम, भाग्यवान फुल्लुके, ताराचंद सुखदेवे, पुंडलिक भैसारे, दयाराम बारसागडे, संतोष टेंभूर्णे, लाला मेश्राम, ग्रा.पं. सदस्य साधू मेश्राम, अशोक रामटेके, देवस्थानचे मुख्य पुजारी हेमराज मानकर उपस्थित होते.
मागील २० फेब्रुवारी २०१६ मध्ये गावातील हिंदू व बौद्धांमध्ये जागेच्या प्रकरणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊन एकोप्याने राहणारा गाव दुभंगला. दोन समाजामधील वाद पराकोटीला गेला. याला मूठमाती देऊन गावात समतेचा संदेश देण्यासाठी समस्त गावकरी एकदिलाने राहण्यासाठीच होळी मिलनाचे औचित्य साधून सर्वधर्म समभाव चहापान कार्यक्रम आयोजित करुन नाना पटोले यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पुढे बोलताना पटोले यांनी, सामाजिक तेढ दोन्ही समाजाला घातक आहे. त्यामुळे समाजाची अपरिमित हाणी होऊन समाजाच्या विकासाला बाधा निर्माण होते. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिल्यानेच कुटुंबासह गावाच्या विकासात भर पडते. वादात सामाजिक जनता नाहक भरडली जाते. धर्माच्या नावावर वाद निर्माण करुन गालबोट लागते.
समाजातील कटूता दूर सारुन समस्त गावकऱ्यांनी एकत्र येवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. आभार सुरेंद्रकुमार ठवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुळशीदास बोरकर, हेमराज मानकर, कुंडलिक मानकर, मुकेश मानकर यांनी सहकार्य केले.

Web Title: The need of the Bahujan Samaj to get organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.