बिबट्याने केली गोऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:46 PM2019-02-24T22:46:39+5:302019-02-24T22:47:05+5:30

जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली. सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे.

The leopard hunts | बिबट्याने केली गोऱ्याची शिकार

बिबट्याने केली गोऱ्याची शिकार

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : सोमलपुरात बिबट्याचा वावर

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली.
सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे. गावाजवळील येरंडी, गुढरी, बाक्टी गावानजीकचा जंगल परिसर असल्याने बिबट वाघासह इतर जंगली जनावरांचा परिसरात नेहमीच वावर असतो. झिंगर दिघोरे यांचे राहते घर गावातील सानगडी मार्गासमोरच्या जंगलव्याप्त परिसराला लागून आहे.
घराच्या समोरील अंगणात बांधलेला ५ वर्षाच्या गोऱ्यावर शनिवारच्या रात्री बिबट्याने हल्ला केला त्यामुळे गोरा दाव्यासकट पळाला. अखेर पाठलाग करुन बिबट्याने त्याला आपले भक्ष्य बनविले. दुसऱ्या दिवशी रविवारला सकाळी ही बाब घरच्यांचा निदर्शनास आली. घरापासून काही अंतरावर बिबट्याने शिकार केलला गोरा मृतावस्थेत आढळला. या परिसरात बिबट्याचा नेहमी वावर असून जनावरांना भक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने जवळच्या येरंडी गावातील घराच्या धाब्यावर आपले बस्थान मांडले होते.घटनेची माहिती होताच नवेगावबांध येथील वनविभागाचे परशुरामकर घटनास्थळी येऊन घटनेची चौकशी केली. गावकऱ्यांनी सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: The leopard hunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.