देवीगड पूजनाने कचारगड यात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:26 PM2019-02-17T22:26:06+5:302019-02-17T22:26:25+5:30

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

Launch of Kachargad Yatra to Devigad worship | देवीगड पूजनाने कचारगड यात्रेला प्रारंभ

देवीगड पूजनाने कचारगड यात्रेला प्रारंभ

Next
ठळक मुद्देजय सेवाच्या गजराने गुफा परिसर दुमदुमला : आज होणार ध्वजारोहण व मान्यवरांचे आगमन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
५ दिवस चालणाऱ्या या कचारगड यात्रेत ध्वजारोहण व मुख्य आयोजनासह लिंगो बाबाची पालखी सोमवारी (दि.१८) धनेगाव ते कचारगड गुफेपर्यंत काढण्यात येईल. यासाठी आदिवासी समाजाचे भूमकाल (पुजारी) कचारगड येथे दाखल झालेले आहेत. मध्य भारतातील विविध प्रांतातून मोठ्या संख्येने भाविकांचे व त्या क्षेत्रातील भूमकाल विधिवत पूजनासाठी कचारगडच्या पवित्र भूमीवर उतरले आहेत. रविवारी पहिल्याच दिवशी ५० हजारच्यावर भावीक कचारगड येथे उतरले असून ‘जय सेवा’चा गजर धनेगाव ते कचारगडपर्यंत ऐकू येवू लागला होता.
सोमवारी (दि.१८) गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते सप्तरंगी शेंडा तर आमदार संजय पुराम यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा ध्वज फडकविण्यात येईल. तर गोंडी भूमकाल यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पूजन विधी करुन जंगो लिंगो द्वारावरुन लिंगो बाबाची पालखी निघणार. यावेळी गोंड आदिवासी समाजातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहून आपली दृढ आस्था व श्रद्धा व्यक्त करीत माँ कली कंकालीच्या पूजेत सहभागी होतील.

दुपारी मुख्यमंत्र्यांचे आगमन
सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भृपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे दुपारी हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते कचारगड कोयापूनेम महोत्सवाचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रोत्साहनाने आयोजित अटल आरोग्य शिबिराचा सुद्धा प्रारंभ करण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी आपापल्या वेगवेगळ्या हेलीकॉप्टरने येथे उतरणार असून सशस्त्र दूर क्षेत्र दरेकसा येथील कॅम्प लगत दोन वेगवेगळे हेलीपॅड तयार करण्यात आले आहेत. या व्यतिरीक्त गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ. संजय पुराम यांच्या सह अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उतरणार असून येथील व्यवस्थेबद्दल आ. पुराम जातीने लक्ष देत आहेत.
अधिकाऱ्यांची भेट
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची कचारगड भेट लक्षात घेता व कचारगड परिसर अतिसंवेदनशील असल्याने रविवारी दिवसभर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व्यवस्था पाहणी करण्यात व्यस्त राहिले. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ए. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिश बैजल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांच्या सह सर्व विभागांच्या अधिकाºयांनी कचारगडला येवून धनेगाव येथील कार्यक्रम परिसरात आयोजनाच्या तयारीच्या आढावा घेतला. राज्याचे शासन प्रमुख आणि लाखोच्या घरात येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेत दरेकसा धनेगाव परिसरात हजारोंच्या संख्येत राज्य पोलीस, एसआरपी, सीआरपीएफ व इतर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

Web Title: Launch of Kachargad Yatra to Devigad worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.