निमगाव प्रकल्प त्वरित मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:44 PM2018-12-02T21:44:36+5:302018-12-02T21:45:32+5:30

तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावण्यात यावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Implementation of Nimgaon Project | निमगाव प्रकल्प त्वरित मार्गी लावा

निमगाव प्रकल्प त्वरित मार्गी लावा

googlenewsNext
ठळक मुद्देविजय रहांगडाले : वन विभागाच्या सचिवांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावण्यात यावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
निमगाव (आंबेनाला) लघू प्रकल्पाला शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये परवानगी दिली होती. एफआरए कडून ३३ कोटी रुपये शासनाकडे भरण्यात आले. परंतु प्रकल्पाचा काही भाग बफर झोनमध्ये येत असल्याने काम सुरु करण्यापूर्वी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची परवानगी आवश्यक असल्याचे मंजुरी अभावी कामे ठप्प झाले.
त्यानंतर वन्यजीव विभागाच्या मंडळासाठी या संबंधिचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे यासाठी २० नोव्हेंबरला आ.रहांगडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर नुकतीच वन खात्याचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून या प्रकल्पामुळे तालुक्यातील ५०० हेक्टर जमिनीला सिंचन होणार असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मागील ४० वर्षापासून वन विभागाच्या अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला असल्याची बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
२० सप्टेंबरला राज्य सरकारने प्रकल्पातील येणाºया अडचणी दूर करुन तिरोडा तालुक्यातील निमगाव लघू प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन जात असल्याने जमिनीचा मोबदला म्हणून वनक्षेत्राला भरपाई म्हणून १४ कोटी २६ लाख ८६ हजार रुपये रहांगडाले यांच्या आग्रहामुळे देण्यात आले.मात्र आता वन्यजीव महामंडळाची परवानगी आवश्यक असल्याचे या प्रकल्पाचे काम पुन्हा लांबणीवर गेले आहे.
सचिव खारगे यांनी परवानगीसाठी प्रस्ताव तयार करुन शासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले. लवकरच वन्यजीव महामंडळाची परवानगी मिळण्याची ग्वाही खरगे यांनी दिली.

प्रकल्पाच्या किंमतीत चाळीस पटीने वाढ
पाटबंधारे विभागाने जुलै १९७३ ला मंज़ुरी दिली होती. त्या वेळी निमगाव प्रकल्पाची किमत २३ कोटी ७० लाख रुपये होती. आता या कामाची किमत १ हजार कोटीच्या गेली असून प्रकल्पाच्या किंमतीत चाळीस पटीने वाढ झाली आहे.

Web Title: Implementation of Nimgaon Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.