रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:16 PM2018-11-22T22:16:47+5:302018-11-22T22:17:44+5:30

जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली.

Four illegal trafficking tractors were seized | रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

Next
ठळक मुद्देमहसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. त्यानंतर गुरूवारी (दि.२२) या दोन्ही विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून डांर्गोली नदीघाटावरुन साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. रेतीचा अवैध साठा करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाविरुध्द रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार राहुल सारंग, रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर, मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी, तलाठी, देवेंद्र भगत, धन्नुलाल मडावी, बिहारीलाल बिसेन,अमित बडोले, अव्वल कारकून आशिष रामटेके, पोलीस शिपाई उमाळे,नंदेश्वर यांच्या पथकाने ही कारवाई केली. २२ नोव्हेंबरला रात्री २ वाजताच्या सुमारास या दोन्ही विभागाचे पथक डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्र परिसरात पॅट्रोलिंग करीत होते. दरम्यान नदीपात्रात रेतीचे उत्खनन करुन त्याची ट्रॅक्टरव्दारे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
पथकातील कर्मचाºयांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरुन पसारा झाला. तर तीन ट्रॅक्टर चालक घटनास्थळीच उपस्थित होते. त्यांचे बयाण नोंदविण्यात आले. घटनास्थळावरुन पोलिसांनी एमएच ३५, झेड ८६६४ होडां कंपनीची ड्रीम निओ व एम एच ३५ यु.२५४९ बजाज कंपनीची डिस्कवर या दोन मोटारसायकल जप्त केल्या. टॅÑक्टरने पळून गेलेल्या चालकाच्या खिशातून पडलेल्या दुचाकीचे नोंदणी बुक व ५ हजार किमतीचा मोबाईल जप्त केला. घटनास्थळावरील शिवशंकर लिल्हारे या व्यक्तीकडे हिरव्या रंगाची नोंदवही आढळली. सदर नोंदवहीत रेतीसाठ्याच्या नोंदी आढळून आल्या. त्याचप्रमाणे नदीपात्रालगत असलेल्या सोनुदेव पहाडीजवळील शासकीय जागेत अंदाजे ३० ब्रास रेतीचा अवैधरित्या केलेला साठा आढळून आला.
यामोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या टॅÑक्टरमध्ये एमएच ३५, जी.५६३१ व ट्राली एफ १५१०,एमएच ३५ एजी २९८२, ट्राली एफ १८९६,एमएच ३५ जी. ५२२२ ट्राली एफ. ३५८८ हे जप्त करण्यात आले. रेतीसह ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नोंदवहीतील नोंदीप्रमाणे अवैधरित्या रेतीचा साठा केल्याप्रकरणी ट्रक्टर चालक व मालकाविरु ध्द रावणवाडी पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी यांनी लेखी तक्र ार नोंदविली आहे.

Web Title: Four illegal trafficking tractors were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू