मिरची ऐवजी मक्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:28 AM2018-05-19T00:28:00+5:302018-05-19T00:28:00+5:30

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे.

Cultivation instead of chilli | मिरची ऐवजी मक्याची लागवड

मिरची ऐवजी मक्याची लागवड

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कल कमी पाण्याच्या पिकांकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पांरपारिक पिकांऐवजी मक्याची लागवड करुन त्यातून भरघोस उत्पादन घेतले.
गोठणगाव येथून तीन चार किलोमीटर अंतरावरील बोंडगाव सुरबन व गंधारी या परिसरात गाढवी नदीपात्रात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करतात. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिरचीऐवजी मक्याची लागवड केली.
मिरचीच्या पिकासाठी पाणी भरपूर लागते.
शिवाय मिरचीचा लागवड खर्च सुद्धा अधिक येतो. वाढती रोगराई व मिरचीचे कमी होत असलेले उत्पादन लक्षात घेता शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली.
मक्क्याची खरेदी आधारभूत केंद्रवर करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी खासगी व्यापाऱ्यांनी ११०० प्रती क्विंटल दराने मक्याची खरेदी केली. तर मागील वर्षी मक्याच्या प्रति क्विंटल दर १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल होता. मक्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवा यासाठी शासनाने धानाप्रमाणेच मक्याला प्रति क्विंटल बोनस जाहीर करण्याची मागणी मक्का उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
एकरी ३५-४० क्विंटल मक्याचे उत्पादन
यंदा शेतकºयांना मक्क्याचे एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन झाले. मक्याची लागवड करण्यासाठी, रासायनिक खत १५ बॅग लागतात. पाणी सुद्धा कमी लागते. जंगली जनावरांमुळे मक्याच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान होते. असे शेतकरी आनंदराव ठलाल, मार्कंड चोरवाडे, कुंदेश्वर चोरवाडे, वासुदेव उईके यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Web Title: Cultivation instead of chilli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी