अधिपरिचारिका आत्महत्या प्रकरणाला निर्णायक वळण

By admin | Published: September 8, 2016 12:24 AM2016-09-08T00:24:28+5:302016-09-08T00:24:28+5:30

येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांनी गेल्या १२ आॅगस्टला जास्त प्रमाणात औषधीचे सेवन करून आत्महत्या केली.

Critical turn of supernova suicide case | अधिपरिचारिका आत्महत्या प्रकरणाला निर्णायक वळण

अधिपरिचारिका आत्महत्या प्रकरणाला निर्णायक वळण

Next

वाहन चालकास अटक : ९ सप्टेंबरपर्यंत पीसीआर, गूढ उकलणार
आमगाव : येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांनी गेल्या १२ आॅगस्टला जास्त प्रमाणात औषधीचे सेवन करून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्महत्येमागील गूढ कायम होते. त्यांच्या आत्महत्येसाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारीच कारणीभूत असल्याची कुजबूज होती. अखेर वाहन चालकाला झाल्याने हे प्रकरण निर्णायक टप्प्यावर आले आहे. मात्र यातील पूर्ण गूढ उकलून सर्व आरोपींना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या २५ दिवसांपासून या आत्महत्येमागील गूढ गुलदस्त्यात होते. त्यामुळे जबाबदार व्यक्तीही पडद्याआड होत्या. पोलिसांनी तपासात गती देत रुग्णालयातील वाहन चालक महेंद्र पुरूषोत्तम चुने (३६) याला अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील पूर्ण गूढ उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमगाव तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आर.एम.गायधने कंत्राटी अधिपरिचारीका कार्यरत होत्या. रुग्णालयातील विशुध्द वातावरणामुळे त्या तणावात वावरत होत्या. यातच दि. १२ आॅगस्टला गायधने यांनी क्लोरोक्विनच्या औषधांचे अधिक सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली होती.
सदर आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी करण्यात आल्याने पोलीस विभागाने प्रकरणाला योग्य वळण दिले. पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी महेंद्र पुरूषोत्तम चुन्ने (३६) रा.कन्हारटोली, सातगाव याला अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ४९८ अ, ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक प्रकरणे तेथील बिघडलेल्या वातावरणामुळे पुढे येत आहे. अधिपरिचारिका आर.एम.गायधने यांच्या मृत्युचे गुढ पुढे आणण्यासाठी रुग्णालयातील कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत काय? याचा शोध घेणे गरजेचे आहे. रुग्णालयातील वाहन चालकाच्या अटकेने रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (शहर प्रतिनिधी)

पती न्यायालयीन कोठडीत
आत्महत्येमागे वेगळे कारण असले तरी मृतक गायधने यांच्या माहेरील लोकांनी पती भानुदास रामकृष्ण मुनेश्वर (३२) यांच्यावरच आरोप केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे पोलीस विभागाने त्यांना २५ आॅगस्टला अटक करून प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली होती. आता मुनेश्वर २९ आॅगस्टपासून न्यायालयीन कोठडीत आहे.

Web Title: Critical turn of supernova suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.