सहकारी संस्थेच्या गोदामात धान किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:47 PM2019-04-27T21:47:04+5:302019-04-27T21:47:28+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी करण्यात आली.मात्र प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दहा गोदाम सील केले.संस्थेच्या गोदामामध्ये नेमके धान किती आहे.

Cooperative Society's warehouse? | सहकारी संस्थेच्या गोदामात धान किती?

सहकारी संस्थेच्या गोदामात धान किती?

Next
ठळक मुद्देधान खरेदीत घोळ । मुंबईची चमू करणार चौकशी, दहा गोदाम केले सील

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी करण्यात आली.मात्र प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दहा गोदाम सील केले.संस्थेच्या गोदामामध्ये नेमके धान किती आहे. याची पाहणी चौकशी करण्यासाठी सोमवारी (दि.२९) ला मुंबईवरुन चमू येणार आहे.
शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ५७ धान खरेदी केंद्रावरुन १८ लाख ३६ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. आजवरची ही सर्वाधिक धान खरेदी होय. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी करण्यासाठी काही सहकारी संस्थाशी करार केला आहे. या संस्था धान खरेदी करुन तो फेडरेशनकडे जमा करतात. यंदा सालेकसा तालुक्यातील खरेदी केंद्रावरुन १ लाख ४० हजार ५८३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी राईस मिल चालकांनी उचल केली. त्यामुळे उर्वरित ६१ हजार क्विंटल धान संबंधित संस्थेचा गोदामात शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र या तालुक्यातील सहकारी संस्थानी खरेदी केलेल्या धानापैकी तब्बल ५० हजार क्विंटल धान गोदामात नसून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत याची शहानिशा करण्यासाठी गुरुवारी (दि.२५) सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थाचे दहा गोदाम सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी गुरूवारी रात्री उशीरापर्यंत दहा ही गोदाम सील करण्याची कारवाही केली. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान सुध्दा सुरक्षीत नसल्याची बाब पुढे आली आहे. यापूर्वी देखील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काही राईस मिल चालकांनी भरडाईसाठी धानाची उचल केली होती. मात्र उचल केलेला धानाची भरडाई करुन तो पूर्णपणे शासनाकडे जमा केला नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तर यंदा पुन्हा खरेदी केंद्राच्या गोदामातील धान गायब असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने धानाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी येणार अधिकारी
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी करण्यात आलेला गोदामातील धान गायब असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर फेडरेशनची यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात गोदामामध्ये धान कमी आहे का याची चौकशी करण्यासाठी सोमवारी (दि.२९) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी चौकशीसाठी मुंबईवरुन येणार आहे. हे अधिकारी काय दिशा निर्देश देतात यानंतर पुढील चौकशीची दिशा ठरविली जाणार आहे.
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एैरणीवर
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी लाखो क्विंटल धानाची खरेदी केली जाते. खरेदी केलेला धान भरडाईसाठी पाठविण्याकरिता संबंधित संस्थाच्या गोदामात ठेवले जाते. मात्र सालेकसा तालुक्यातील धानाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणी असलेल्या २०० गोदामामध्ये धान सुरक्षीत आहे का यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
१५ लाख क्विंटल धानाची उचल
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा ५७ धान खरेदी केंद्रावरुन एकूण १८ लाख ३६ हजार क्विंटल धान खरेदी केली. यापैकी आत्तापर्यंत १५ लाख क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली आहे. तर उर्वरित ३ लाख ३६ हजार क्विंटल धान जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये पडला आहे.
धानाचे मोजमाप करणे अवघड
सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थानी एकूण १ लाख ४० हजार ५८३ क्विंटल धान खरेदी केली. यापैकी तब्बल ५० हजार क्विंटल धान गोदामात नसल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. मात्र गोदामात नेमके किती धान शिल्लक आहे याचे मोजमाप करण्याची बाब अवघड असल्याचे या विभागाचे अधिकारी बोलत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुंबईवरुन येणारे अधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी तब्बल ५० हजार क्विंटल धान गोदाम कमी असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असून १० गोदाम सील करण्यात आले आहे.
- अनिल सवई,
जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया

धानातील तफावतीची चौकशी करण्यासाठी सोमवारी मुंबईवरुन अधिकारी येणार आहे. तसेच जिल्हाधिकाºयांच्या पुढील निर्देशानुसार कारवाही केली जाईल.
- मनोज गोन्नाडे,
प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदिया.

Web Title: Cooperative Society's warehouse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.