रिकाम्या प्लॉटवर दलालांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:50 PM2018-03-16T23:50:44+5:302018-03-16T23:50:44+5:30

येथील नगर परिषदेच्या हद्दितील खासगी जमिनीवर भूमाफियाकडून एकाच प्लॉटला दोन व्यक्तींना विकून बळजबरीने अतिक्रमण केल्याच्या घटना घडत आहेत. आमगाव नगरीत दिवसेंदिवस कुटुंबसंख्या व लोकवस्ती वाढत आहे.

Brokered eyes on empty plots | रिकाम्या प्लॉटवर दलालांची नजर

रिकाम्या प्लॉटवर दलालांची नजर

Next
ठळक मुद्देजमिनी असुरक्षित : एकाच प्लॉटची अनेकांना विक्री

राजीव फुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील नगर परिषदेच्या हद्दितील खासगी जमिनीवर भूमाफियाकडून एकाच प्लॉटला दोन व्यक्तींना विकून बळजबरीने अतिक्रमण केल्याच्या घटना घडत आहेत. आमगाव नगरीत दिवसेंदिवस कुटुंबसंख्या व लोकवस्ती वाढत आहे. जवळील बनगाव येथे शेतकऱ्यांच्या कृषक जमिनी अल्पदरात प्लॉट डेव्हलपर्सकडून खरेदी केली जात आहे.
येथील दलाल कृषक जमिनीला तलाठ्यांना हातात घेऊन अकृषक व फेरफार प्रक्रिया पूर्ण करतात. अनेक दलाल आपल्या नकाशात खुली जागा, मंदिर, गटारे, बाग-बगिचे, खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दर्शवितात. पण मोक्यावर असे काहीच दिसून येत नाही.
राखीव जागेला पण प्लॉट रुपांतरित करुन सदर राखीव जमिनीची विक्री करताना दिसून येतात. तसेच एखाद्या प्लाट खरेदी करणाºया व्यक्तींने खरेदी केली, बयाना देवून हलपनामावर व्यवहार केले असेल, पण सदर प्लॉट अधिक दरात दुसरा व्यक्ती खरेदी करीत असेल तर तो प्लॉट त्या व्यक्तीला विक्री करावा, असा गोरखधंदा सर्रासपणे सुरु आहे.
असाच एक प्रकार बनगाव येथील कामठा रस्त्यालगतच्या प्रपोरुड लेआऊट येथे घडला. सदर लेआऊट सन १९९६ मध्ये विक्री करण्यात आले. गट क्र. १५०/३ आराजी ०.०८ हे.आर. मूळ मालक मोडकू झिंगर मेंढे यांच्याकडून खरेदी करुन प्लॉट विक्री-खरेदीचे व्यवहार करण्यात आले. या ठिकाणी एकून २६ प्लॉटची आखणी करण्यात आली. नवीन गट क्र. ४३९/३ नुसार लेआऊट नकाशा प्रमाणे प्लॉट क्र. ७, ८, ९ व १० हे. सदर चार प्लाट १३ मे १९९६ मध्ये नवेगाव येथील गोरेलाल नारायण बिसेन यांच्या कडून कट्टीपार येथील नामदेव सापकू भांडारकर यांच्याकडून खरेदी केली. त्याप्रमाणे भांडारकर यांनी सदर प्लाटवर विहीर तयार केले. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी महेंद्र धुलीचंद चौरडिया (जैन) रा. आमगाव यांनी ही जमिन माझी आहे, त्यावर आपले हक्क दाखवित दर्शनिय भागातील खूना मिटवून पिण्याच्या पाण्याची विहीर बुझविली.
या प्रकरणी भांडारकर यांनी ६ फेब्रुवारीला आमगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली. सदर जमिनीचा मूळ मालक मोडकू झिंगर मेंढे व गोरेलाल नारायण बिसेन यांनी जे प्लॉट विक्री केले ते २६ प्लॉट लेआऊट नकाशापैकी, प्लॉट क्र. ७, ८, ९ व १० नामदेव भांडारकर यांना विक्री करुन त्यांनाच कब्जा देण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. गट क्र. १५०/३ मधील ०.८ हे.आर. पैकी ०.४ हे.आर. आणि रजिस्ट्री प्रमाणे ४३९ चे ०.४ हे.आर. जमिन भांडारकर यांना कब्जा दिल्याचेही म्हटले आहे. असे अनेक प्रकार दलालामार्फत होत असल्याने आपल्याला न्याय मिळावे याकरिता सदर प्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे.
तालुक्यात अनेक दिवसांपासून एका प्लॉटवर अनेकांची रजिस्ट्री केल्याचे प्रकार दिसून येत आहे. यात गट क्र. एकच असतो. फक्त बटे आर मध्ये फरक जानवतो. पण प्लॉट एकच असतो, याचा फायदा घेत दलाल खरेदी करणाºया नागरिकांची फसवणूक करीत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
सदर जमिनी बळकावण्याकरिता दलालांमार्फत बळाचा वापरही केला जात आहे. मागे अनिहा नगर येथे पोलीस व भूमिअभिलेख अधिकाºयांना वेठीस धरुन पैसाच्या बळावर जमीन बळकावून मूळ मालकावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याची पूर्णावृत्ती घडू नये यासाठी नागरिकांचे लक्ष या प्रकरणी लागले आहे.

Web Title: Brokered eyes on empty plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.