कृषी विद्यार्थ्यांनी शेतातून प्रयोगशाळा गाठावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:43 AM2017-12-10T00:43:38+5:302017-12-10T00:43:49+5:30

विद्यार्थ्यांनी आधी प्रयोगशाळत परीक्षण न करता आधी शेतात जाऊन प्रात्याक्षीक करून नंतर प्रयोगशाळेत अभ्यास करावा. महाविद्यालय खासगी असो की शासकीय असो शिक्षण हे विद्यापीठांतर्गत असते. पदवी विद्यापीठाची मिळते. मेडीकलनंतर अ‍ॅग्रीकल्चरही महत्वाचे क्षेत्र आहे.

Agriculture students get laboratory from the field | कृषी विद्यार्थ्यांनी शेतातून प्रयोगशाळा गाठावी

कृषी विद्यार्थ्यांनी शेतातून प्रयोगशाळा गाठावी

Next
ठळक मुद्देव्ही.एम. भाले : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोलाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांनी आधी प्रयोगशाळत परीक्षण न करता आधी शेतात जाऊन प्रात्याक्षीक करून नंतर प्रयोगशाळेत अभ्यास करावा. महाविद्यालय खासगी असो की शासकीय असो शिक्षण हे विद्यापीठांतर्गत असते. पदवी विद्यापीठाची मिळते. मेडीकलनंतर अ‍ॅग्रीकल्चरही महत्वाचे क्षेत्र आहे. नोकर बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले?
गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयात शनिवारी (दि.९) रोजी भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना बोलत होते. कुलगुरू भाले म्हणाले, शिक्षणात मुलांपेक्षा मुली समोर असून त्या गुणवत्तेतही पुढे आहेत. मुलांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन पाठ्यक्रम फार कठीण आहे त्यासाठी मेहनत करावी लागेल. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू भाले यांना विविध प्रश्न विचारले. तया प्रश्नांचे समाधानकारक उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. या वेळी मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलास डोंगरे, संस्थेचे मार्गदर्शक डॉ.के.एस. गजभिये, प्राचार्य डॉ. विक्की नंदेश्वर, उपप्राचार्य डॉ. डी.एच. गिºहेपुंजे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कुलगुरू भाले यांनी महाविद्यालय परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.
कृषीला भविष्यात काय महत्व आहे असे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता त्यावर कृषीप्रधान देशात कृषीचे महत्व कधीच कमी होणार नाही असे कुलगुरू भाले यांनी सांगीतले. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या तूर पिकाचे निरीक्षण केले. कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र डोंगरे तर आभार प्राचार्य डॉ. नंदेश्वर यांनी मानले.

Web Title: Agriculture students get laboratory from the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.