जिल्ह्यात वर्षभरात ९७२ गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:26 AM2018-05-27T00:26:48+5:302018-05-27T00:27:01+5:30

संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे.

9 72 abortions in the district in the year | जिल्ह्यात वर्षभरात ९७२ गर्भपात

जिल्ह्यात वर्षभरात ९७२ गर्भपात

googlenewsNext
ठळक मुद्देविविध अडचणींमुळे गर्भपात : शासकीयपेक्षा खासगी केंद्रात तीनपट गर्भपात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात गर्भपाताची आकडेवारी पाहिल्यावर अशिक्षित समाजाच्या तुलनेत सुशिक्षीत समाजात अधिक गर्भपात होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केला आहे.
यातील ९२५ गर्भपात केवळ १२ आठवड्यात झाले आहेत. तर ४७ गर्भपात १२ ते २० आठवड्याच्या आत झाले आहेत. शासन निर्णयानुसार माता गर्भातील बाळाला त्रास असल्यास विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भपात करू शकतात. गर्भवती महिलांचा १२ आठवड्यात केलेल्या गर्भपाताचा आकडा सर्वाधीक आहे. गर्भवती मातेला त्रास किंवा बाळाला त्रास असल्यास १२ ते २० आठवड्याच्या आत गर्भपात केले जाते. परंतु जोपर्यंत विशेषतज्ज्ञ परवनागी देत नाही तोपर्यंत गर्भपात करता येत नाही. गर्भपातामुळे मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. जिल्ह्यात १२ शासकीय व २० खासगी रूग्णालयांना शासनातर्फे गर्भपात केंद्र मंजूर केले आहेत.
यात गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, तिरोडा उपजिल्हा रूग्णालय, देवरी ग्रामीण रूग्णालय, चिचगड ग्रामीण रूग्णालय, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रूग्णालय, नवेगावबांध ग्रामीण रूग्णालय, सालेकसा ग्रामीण रूग्णालय, आमगाव ग्रामीण रूग्णालय, सडक-अर्जुनी ग्रामीण रूग्णालय, गोरेगाव ग्रामीण रूग्णालय, रजेगाव ग्रामीण रूग्णालय व बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. जिल्ह्यात या रूग्णालया व्यतिरिक्त गर्भपात होत असतील तर ते अवैध गर्भपात आहेत.
२४ वर्षाखालील महिलांचे २१५ गर्भपात
जिल्ह्यात मागील वर्षी ९७२ गर्भपात करण्यात आले. यातील २१५ गर्भपात २४ वर्षातील तरूणी व महिलांचे आहेत. यात १५ वर्षापेक्षा कमी वयाची एक मुलगी, १५ ते १९ वर्षातील २१, २० ते २४ वर्षातील १९३ तरूणी-महिलांचा समावेश आहे. २५ ते २९ वर्षातील ३६६ महिलांचा गर्भपात करण्यात आला. ३० ते ३४ वर्षातील २७१ गर्भपात झाले. ३५ ते ३९ वर्षातील ९४ महिला, ४० ते ४४ वर्षातील २१ व ४५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या ३ महिलांचे गर्भपात करण्यात आले. ६६ महिलांना गर्भधारणेचा धोका, १४४ महिलांचे शारीरिक आरोग्य, ९२ महिलांचे मानसिक आरोग्य, ३९ बालकांना धोका असल्याने व ६१८ महिलांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने गर्भपात करण्यात आले. ११ बलात्कार पिडितांचा गर्भपात करण्यात आला.
६५ टक्के गर्भपात खासगी रूग्णालयात
जिल्ह्यात एक वर्षात झालेल्या ९७२ गर्भपातांपैकी ६३१ (६४.९१ टक्के) गर्भपात खासगी रूग्णालयात करण्यात आले. शासकीय रूग्णालयात २२८ गर्भपात करण्यात आले. गर्भपात करणाऱ्या महिलांमध्ये ९०४ विवाहित, ४९ अविवाहित, तर १९ अज्ञात महिला व तरूणींचा समावेश आहे.

Web Title: 9 72 abortions in the district in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.