९ हजार नुकसानग्रस्तांना २ कोटी ७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:54 PM2018-01-20T21:54:42+5:302018-01-20T21:55:04+5:30

जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यांमुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला होता.

2 thousand 70 lakhs to 9 thousand victims | ९ हजार नुकसानग्रस्तांना २ कोटी ७० लाख

९ हजार नुकसानग्रस्तांना २ कोटी ७० लाख

Next
ठळक मुद्देतहसीलदारांकडे निधी वळता : जिल्ह्यातील पिडितांना विशेष मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यामुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला होता. या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपये शासनाने मंजूर केले आहे. त्या नुकसानग्रस्तांना सदर मदत देण्यासाठी ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा व गोंदिया या आठही तालुक्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्याने घरांचे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मंत्रिमंडळाने या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्यासाठी २३ मे २०१७ रोजी शासन निर्णय काढला. यासंदर्भात ८ जून २०१७ रोजी शासनाचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. ३ आॅगस्ट २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. या वादळवाऱ्यात अंशत: पडझड झालेल्या ७ हजार ५३६ कच्ची घरे जमीनदोस्त झाली होती. ३६६ पक्क्या घरांना अंशत: झळ पोहचली होती. अश्या एकूण ८ हजार ६५ घरांचे नुकसान झाले. तर १ हजार २६९ गोठ्यांचे नुकसान झाले.
गोंदिया तालुक्यात २ हजार ७३२ अंशत: कच्ची घरे पडले. १५९ कच्चे घरे जमीनदोस्त झालीत. ३६५ पक्की घरे अंशत: अशा ३ हजार २५६ घरांचे नुकसान झाले. गोरेगाव तालुक्यात १ हजार १०३ अंशत: कच्ची घरे पडली. ४ कच्चीे घरे जमीनदोस्त झालीत अशा १ हजार १०७ घरांचे नुकसान झाले. तर ५८ गोठ्यांचे नुकसान झाले होते. तिरोडा तालुक्यात ९८६ अंशत: कच्ची घर पडली. तर ११४ गोठ्यांचे नुकसान झाले होते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ हजार ८१८ अंशत: कच्चे घर पडले. तर २० गोठ्यांचे नुकसान झाले. देवरी तालुक्यात ३० अंशत: कच्चे घर पडले. तर सात गोठ्यांचे नुकसान झाले. आमगाव तालुक्यात ५८२ अंशत: कच्चे घर पडले. तर १०५६ गोठ्यांचे नुकसान झाले. सालेकसा तालुक्यात १५३ अंशत: कच्चे घर पडले. चार गोठ्यांचे नुकसान झाले. सडक-अर्जुनी तालुक्यात १३२ अंशत: कच्चे घर पडले. १० गोठ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सर्वाधिक मदत गोंदिया तालुक्यात
२१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यांमुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत म्हणून गोंदिया तालुक्याला एक कोटी ३५ लाख ३ हजार ३५० रूपये, गोरेगाव तालुक्यासाठी ३१ लाख ६० हजार ५० रूपये, तिरोडा तालुक्यासाठी ३३ लाख ९४ हजार ६०० रूपये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी २१ लाख १५ हजार ७५० रूपये, देवरी तालुक्यासाठी १ लाख २ हजार ३०० रूपये, आमगाव तालुक्यासाठी ४० लाख ८० हजार, सालेकसा तालुक्यासाठी २ लाख ९४ हजार ३०० रूपये, सडक - अर्जुनी तालुक्यासाठी ३ लाख ७१ हजार १५० रूपयांचा निधी तहसीलदारांकडे वळता करण्यात आला आहे.

Web Title: 2 thousand 70 lakhs to 9 thousand victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.