शहराच्या विकासासाठी २ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:19 AM2018-03-04T00:19:32+5:302018-03-04T00:19:32+5:30

शहराच्या विकासासाठी प्रशासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून शहरातील विविध भागांतील काही विकास कामे पूर्णत्वास आली असून काही कामे सुरु आहेत.

2 crore fund for the development of the city | शहराच्या विकासासाठी २ कोटींचा निधी

शहराच्या विकासासाठी २ कोटींचा निधी

Next

ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : शहराच्या विकासासाठी प्रशासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून शहरातील विविध भागांतील काही विकास कामे पूर्णत्वास आली असून काही कामे सुरु आहेत.
न. प.ने गेल्या अडीच वर्षात रस्ते बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, १२६० शौचालये, ११ शौचालय दुरूस्ती, पाणी टाकी, बोअरवेल, विद्युत मिटर, १७ इंधन विहीर, २ फिल्टर (आरओ), पवन तलाव सौंदर्यीकरण, सिमेंट बेंचेस, दलित्तोतर योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, महाराष्टÑ नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, एम.जे.पी. मिनी वाटर सप्लाय स्किम, ३ टक्के महिला व बालकल्याण विकास निधी, ५ टक्के महिला व बालकल्याण विकास निधी, संगणीकृत कर आकारणी, पेविंग ब्लाक, ग्रिन जीम, शहरात ठिकठिकाणी हायमास्ट लाईट इत्यादी कामे काम करण्यात आली आहे.
पवन तलावच्या सौंदर्यीकरणात भर
शहराच्या मध्यभागी असलेल्या पवन तलावच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. येथे श्रमदान व शासन निधीतून खेळणी, झुले, घसरण पाटी, सिमेंट खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. तसेच पवन तलाव व राधाकृष्ण मंदिराच्या आवारात पेविंग ब्लाक, ग्रिन जीम, हायमास्ट लाईट, फिल्टर प्लांटची (आरओ) व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: 2 crore fund for the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.