फोंडा नगरपालिकेच्या तेरा प्रभागासाठी मतदान, सरकारी यंत्रणा सज्ज

By आप्पा बुवा | Published: May 4, 2023 07:57 PM2023-05-04T19:57:32+5:302023-05-04T19:58:06+5:30

एकूण 14,271 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून  यामध्ये पुरुष मतदार हे 7 116 आहे तर महिला मतदार 7155 आहेत.

Voting for Thirteen ward of Fonda municipality, government machinery ready | फोंडा नगरपालिकेच्या तेरा प्रभागासाठी मतदान, सरकारी यंत्रणा सज्ज

फोंडा नगरपालिकेच्या तेरा प्रभागासाठी मतदान, सरकारी यंत्रणा सज्ज

googlenewsNext

फोंडा - फोंडा नगरपालिकेच्या 13 प्रभागासाठी उद्या मतदान होणार असून, एकूण 22 मतदान केंद्रांवर सदरची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सरकारी यंत्रणा सर्वतोपरी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित 13 प्रभागासाठी आज मतदान होणार आहे. एकूण 14,271 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून  यामध्ये पुरुष मतदार हे 7 116 आहे तर महिला मतदार 7155 आहेत.

 विविध मतदान केंद्रावर सामुग्री घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर निवडणूक संदर्भातील कर्मचारी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे मतदार केंद्र संबंधित सामग्री सुपूर्द करण्यात आली. संध्याकाळी चार पर्यंत सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर व उपजिल्हाधिकारी फळदेसाई हे सर्व मतदान केंद्रावर जाऊन तयारीचा आढावा घेत असल्याचे आढळून आले.

 भाजप व रायझिंग फोंडा मध्ये खरी लढत :
 प्रचाराच्या सुरुवातीला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार केल्याने भाजपने प्रचारात आघाडी घेतली होती. खासदार विनय तेंडुलकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर व  भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सर्व प्रभागांमध्ये चांगल्या प्रमाणात व्यवरचना केली. सर्वानी घरोघरी प्रचारावर जास्त भर दिला.भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी हे बिनविरोध आल्याने त्यांना इतर प्रभागांमध्ये काम करण्यासाठी मोकळीक मिळाली. त्याचा फायदा नक्कीच भाजपला होईल.

 शेवटच्या पाच दिवसात मात्र डॉ. केतन भाटीकर यांच्या रायझिंग फोंडाने चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागात काटे कि टक्कर अपेक्षित असून जो कोणी उमेदवार निवडून येईल तो अवघ्या काही मतानी निवडून येण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी जाहीर प्रचार जरी थांबलेला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधने मात्र चालूच होते. युवा उमेदवारांनी यावेळी डिजिटल माध्यमाचा प्रचारासाठी चांगला उपयोग करून घेतल्याचे दिसून आले.

मतदान कमी होणार :
प्रभाग वार उमेदवाराच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मतदार यादीतील काही नावे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. काही मतदारांनी  इतरत्र स्थलांतर केल्यामुळे ती नावे तशीच राहिली आहेत. परिणामी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची जास्त शक्यता आहे.
 

 

Web Title: Voting for Thirteen ward of Fonda municipality, government machinery ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.