गोव्यात पावसाचा धडाका कायम, अतिवृष्टीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 10:56 AM2018-06-09T10:56:40+5:302018-06-09T11:04:21+5:30

गोव्यात शुक्रवारी (8 जून) रात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंतही जोरदार बरसत आहे. मागील 24 तासांत सरासरी 5.5 इंच पावसाची नोंद येथे झाली आहे.

Very Heavy rainfall likely in coastal Maharashtra, Goa today | गोव्यात पावसाचा धडाका कायम, अतिवृष्टीची शक्यता

गोव्यात पावसाचा धडाका कायम, अतिवृष्टीची शक्यता

पणजी -  गोव्यात शुक्रवारी (8 जून) रात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंतही जोरदार बरसत आहे. मागील 24 तासांत सरासरी 5.5 इंच पावसाची नोंद येथे झाली आहे. किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ढगांची दाटी झाली असल्यामुळे गोवा व कोंकणात जोरदार वृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पणजीत साडेपाच इंच तर काणकोण व मुरगावमध्ये 24 तासात साडेसहा इंचांहून अधिक पाऊस पडला. शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम एल साहू यांनी म्हटले आहे. 

हवामान खात्याच्या आल्तिनो - पणजी येथील डॉप्लर रडारवरून टीपलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार कर्नाटक, गोवा व कोंकणच्या आकाशात पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे. अरबी समुद्रात नैऋत्य दिशेला 150 किलोमीटर लांब अंतरापासून हे ढग दाटलेले दिसत असल्यामुळे पावसाचा धडाका उद्याही राहील, असे संकेत आहेत. हवामान खात्याने शनिवारी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला होता. 



 

Web Title: Very Heavy rainfall likely in coastal Maharashtra, Goa today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.