टुरीस्ट गाईडना घ्यावे लागेल केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण

By पूजा प्रभूगावकर | Published: March 9, 2024 01:58 PM2024-03-09T13:58:39+5:302024-03-09T13:58:59+5:30

या उमेदवारांना अगोदर केंद्र सरकारचे 'इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर कार्यक्रम' अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल

Tourist guides have to undergo Central and State certified training | टुरीस्ट गाईडना घ्यावे लागेल केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण

टुरीस्ट गाईडना घ्यावे लागेल केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण

पणजी: गोव्यात पर्यटक गाईड म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना आता केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण घ्यावे लागेल असे पर्यटन खात्याने नमूद केले आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर कार्यक्रम' अंतर्गत टुरीस्ट गाईड होण्यास इच्छुक असणाऱ्यांना हे प्रमाणपत्र प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी त्यांनी https://iitf.gov.in/ या संकेस्थळावर आपले नोंद करावे असे आवाहन खात्याने केले आहे. 

या उमेदवारांना अगोदर केंद्र सरकारचे 'इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर कार्यक्रम' अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना गोवा पर्यटन खात्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. दोन्ही प्रमाणपत्रित प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या उमेदवारांना गोव्यात टुरीस्ट गाईड म्हणून आपले नाव नोंद करता येईल असेही पर्यटन खात्याने नमूद केले आहे.

Web Title: Tourist guides have to undergo Central and State certified training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन