मुख्यमंत्र्यांनी साखळीत कुटूंबियांसमवेत लुटला रंगोत्सवाचा आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 04:06 PM2024-03-25T16:06:55+5:302024-03-25T16:08:37+5:30

बच्चे कंपनीने मुख्यमंत्र्यांना रंग लावून, गुलाल उधळत रंगपंचमी साजरी केली. त्यांनी समस्त गोमंतकीयांना व देशवासीयांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. 

The Chief Minister enjoyed the color festival with his family in sakhli | मुख्यमंत्र्यांनी साखळीत कुटूंबियांसमवेत लुटला रंगोत्सवाचा आनंद 

फोटो : साखळी येथे कुटुंबातील सदस्यांसोबत रंगोत्सवात सहभागी झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. (छाया : विशांत वझे)

डिचोली : राजकारण व समाजकारणात व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी होळीनिमित्त सोमवारी सकाळी थोडा वेळ काढून आपल्या निवासस्थानी कुटूंबिय, बालगोपाळांसह कार्यकर्त्यांसमवेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी अनेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. बच्चे कंपनीने मुख्यमंत्र्यांना रंग लावून, गुलाल उधळत रंगपंचमी साजरी केली. त्यांनी समस्त गोमंतकीयांना व देशवासीयांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. 

‘रंगोत्सवाच्या माध्यमातून आगळा-वेगळा आनंद लुटण्याची संधी समस्त गोमंतकीयांना लाभली आहे. याबरोबरच जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने गोव्याच्या विकासात आपले योगदान द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत’ असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. गोव्यात तसेच देशपातळीवर भाजपने नारी शक्तीला वाव दिला आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात महिलेला उमेदवारी हे महिला आरक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पक्ष आतापासूनच सक्रीय झाल्याचे उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. विरोधक काय टिप्पणी करतात याला आमच्यादृष्टीने महत्व नाही. आम्ही आमचे काम,  जनसेवासुरू ठेवली आहे असे ते म्हणाले. 

 

Web Title: The Chief Minister enjoyed the color festival with his family in sakhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.