उभयचर बसचा मार्ग मोकळा, गोव्यात पर्यटकांचे ठरणार विशेष आकर्षण  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 02:57 PM2018-01-21T14:57:16+5:302018-01-21T14:57:44+5:30

The special attraction of tourists in Goa will be to free the amphibious bus | उभयचर बसचा मार्ग मोकळा, गोव्यात पर्यटकांचे ठरणार विशेष आकर्षण  

उभयचर बसचा मार्ग मोकळा, गोव्यात पर्यटकांचे ठरणार विशेष आकर्षण  

Next

पणजी - पर्यटकांचे आकर्षण ठरणार असलेल्या उभयचर बसचा मार्ग केंद्राने अधिसूचना काढल्याने मोकळा झाला असून चालू महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर ती व्यावसायिक वापरात आणली जाईल आणि मार्चअखेरपर्यंत तिकिटे लावून पर्यटकांना या बसमधून सफरीचा आनंद लुटता येईल.  

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली. प्रात्यक्षिक घेऊनही गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ ही बस विनावापर पडून होती. जगभरात अशा प्रकारची वाहने चालू आहेत. या वाहनांना परवान्यांचा मार्ग मोकळा करणारी अधिसूचना केंद्र सरकारने नुकतीच काढल्याने हा अडसरही आता दूर झाला आहे. पाण्यात तसेच जमिनीवर चालणारी ही उभयचर बस पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

राज्यात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाण्यात उतरणारे ‘सी प्लेन’ही सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती परंतु ती काही अजून प्रत्यक्षात प्रत्यक्षात आलेले नाही.  सी प्लेन चालविण्यासाठी हवाई वाहतूक संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारा पायलट असावा लागतो. मुख्य वैमानिकाला किमान ५00 तास आणि सह वैमानिकाला किमान १२५ तास उड्डाणाचा अनुभव असायला हवा. ही सेवा सुरु करण्यासाठी सुप्रिम ट्रान्स्पोर्ट प्रा, लि, या कंपनीची निवड केलेली आहे. देशात कुठेही सी प्लेनची सेवा नाही. गोव्यातच आम्ही ती प्रथम सुरु करण्यात येणार आहे. परंतु कंपनीला अजून अनुभवी पायलट न मिळाल्याने दुसºया कंपनीकडे आता प्रयत्न केला जात असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. 

उभयचर बस हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या परवान्याची तसेच व्यावसायिक तत्त्वावर ती चालविण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. ही बस महामंडळाकडे उपलब्ध आहे परंतु गेले दीड वर्ष ती पडून होती. 

Web Title: The special attraction of tourists in Goa will be to free the amphibious bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.