स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन, कामांचे ऑडिट होई पर्यंत कामे बंद करा; उदय मडकईकरांची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Published: March 20, 2024 11:45 AM2024-03-20T11:45:54+5:302024-03-20T11:47:22+5:30

स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

smart city works substandard stop works till work are audited demand by uday madkaikar | स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन, कामांचे ऑडिट होई पर्यंत कामे बंद करा; उदय मडकईकरांची मागणी

स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन, कामांचे ऑडिट होई पर्यंत कामे बंद करा; उदय मडकईकरांची मागणी

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पणजीत स्मार्ट सिटी कंत्राटदाराकडून दर्जाहीन काम केले जात आहे. या सर्व कामांचे ऑडिट करावे व तो पर्यंत कामे बंद करावीत अशी मागणी पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी केला आहे.

स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कामगार ज्या पध्दतीने ही कामे करीत आहेत, त्यावरुनच त्यांचा दर्जा समजतो. त्यामुळे पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात व स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांनी दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मडकईकर म्हणाले, की पणजीत सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे होत असून रस्ते खोदले जात आहेत. या कामांचे कंत्राट स्मार्ट सिटीने कंत्राटदारांना दिले आहे. मात्र कंत्राटदारांकडून दर्जाहीन पध्दतीने ही कामे केली जात असल्याचे उघड झाले आहे. स्मार्ट सिटीची कामे ही दर्जाहीन असल्याचा वारंवार आरोप आपण केला आहे. या कामांचे ऑडिट व्हावी अशी मागणीही पणजी महानगरपालिकेच्या बैठकीत यापूर्वी केली होती. मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही असे त्यांनी नमूद केले.

Web Title: smart city works substandard stop works till work are audited demand by uday madkaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.