54 लाखांचे सोने पळवणा-या श्रवणनाथला कुडाळला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 06:39 PM2018-05-01T18:39:20+5:302018-05-01T18:39:20+5:30

मुंबईतून बसवरून पाठविलेल्या 54 लाखांची सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असलेले पार्सल परस्पर पळविण्याचा कट रचलेल्या बागोडा-राजस्थान येथील श्रवणनाथ या संशयिताला मडगाव पोलिसांनी कुडाळ येथे अटक केली.

Shravarnath gets Rs 54 lakh worth of gold | 54 लाखांचे सोने पळवणा-या श्रवणनाथला कुडाळला अटक

54 लाखांचे सोने पळवणा-या श्रवणनाथला कुडाळला अटक

Next

मडगाव : मुंबईतून बसवरून पाठविलेल्या 54 लाखांची सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असलेले पार्सल परस्पर पळविण्याचा कट रचलेल्या बागोडा-राजस्थान येथील श्रवणनाथ या संशयिताला मडगाव पोलिसांनी कुडाळ येथे अटक केली. सोमवारी रात्री त्याला मडगावात आणण्यात आले. संशयिताकडून सर्व सोने पोलिसांनी जप्त केले.

मागच्या शुक्रवारी ही घटना घडली होती. मडगावातील एक व्यापारी संजय विर्डीकर यांच्या मालकीची बस असून, या बसवरून मडगावच्या सोनारासाठी अशी पार्सल्स पाठविली जायची. विर्डीकर यांचे मोबाईलचेही दुकान असून या मोबाईलच्या दुकानावर संशयित श्रवणनाथ हा कामाला होता. मुंबईतील बसवरुन आलेले पार्सल आणण्यासाठी विर्डीकर यांनी त्याला पाठविले असता हे पार्सल घेऊन तो परस्पर पसार झाला. या प्रकरणात लगेच मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली.

मडगावचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर संशयित बसवर बसून पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, विर्डीकर यांनी या संशयिताचे छायाचित्र वॉटस्अ‍ॅपवरुन आपल्या सर्व मित्रंना पाठवून दिले. विर्डीकर यांच्या मित्रने आपल्या कुडाळच्या एका मित्रला हे छायाचित्र पाठवून दिले. या मित्रने कुडाळ येथे बस अडविल्यावर बसमध्ये बसलेला संशयित त्याला दिसला. झालेला प्रकार स्थानिकांना कथन केल्यानंतर स्थानिकांच्याच मदतीने त्याला कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले. सोमवारी मडगाव पोलिसांच्या तुकडीने संशयितासह त्याने चोरलेल्या दागिन्यांचा ताबा घेतला. सोमवारी रात्री त्याला मडगावात आणून रितसर अटक केली. सोमवारी त्याला मडगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Web Title: Shravarnath gets Rs 54 lakh worth of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.