बुडणा-या विदेशी पर्यटकांना गोव्यातील पाळोळे बीचवर शॅक व्यावसायिकांनी वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 10:27 PM2017-12-03T22:27:50+5:302017-12-03T22:44:04+5:30

मडगाव : शॉक्स मालकांच्या प्रसंगावधानाने दोन विदेशी महिला पर्यटकांचे प्राण वाचले. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील व्होअरे - पाळोळे या किना-यावर ही घटना घडली.

Shoox practitioners saved Goa's parochas on the outskirts of the drought-hit foreign tourists | बुडणा-या विदेशी पर्यटकांना गोव्यातील पाळोळे बीचवर शॅक व्यावसायिकांनी वाचविले

बुडणा-या विदेशी पर्यटकांना गोव्यातील पाळोळे बीचवर शॅक व्यावसायिकांनी वाचविले

Next

मडगाव : शॉक्स मालकांच्या प्रसंगावधानाने दोन विदेशी महिला पर्यटकांचे प्राण वाचले. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील व्होअरे - पाळोळे या किना-यावर ही घटना घडली. समुद्र खवळलेला असताना रविवारी पहाटे आंघोळीसाठी उतरल्या असता नताशा माहोन (31) व काटिरिवोना (30) या आयरिश येथील महिला पर्यटक बुडू लागल्या.

जिवांच्या आकांताने त्यांनी वाचवा वाचवा अशा हाका मारण्यास सुरुवात केली असता, त्यांना वाचविण्यासाठी एका इसमाने समुद्राच्या पाण्यात स्वतला झोकून दिले. मात्र समुद्र खवळला असल्याने व लाटांचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला. ही घटना समुद्रकिना-यावरील शॉक्स व्यावसायिकांनी बघितल्यानंतर प्रसंगावधान राखून त्यांनी दोरीच्या मदतीने त्या तिघांना सुखरुप बचाविले. दरम्यान, ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात कुणी उतरू नये यासाठी किना-यावर तैनात जीवरक्षक पर्यटकांना सूचना देत असल्या तरी पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सद्या समुद्रात कुणीही उतरू नये, असे आवाहन जीवरक्षकांकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Shoox practitioners saved Goa's parochas on the outskirts of the drought-hit foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा