गोव्यात ३ ते १७ मार्च शिमगोत्सव, रात्री १0 वाजता मिरवणूक संपविण्याची अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 10:15 PM2018-01-31T22:15:06+5:302018-01-31T22:15:17+5:30

राज्यात ३ ते १७ मार्च या कालावधीत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत. बुधवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी बैठक घेऊन यासंबंधी आढावा घेतला. राजधानी शहरातील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग बदलून मिरामार सर्कल ते दोनापॉल असा करण्याचा प्रस्ताव आहे.

Shimagotsav, 3 to 17 March in Goa; | गोव्यात ३ ते १७ मार्च शिमगोत्सव, रात्री १0 वाजता मिरवणूक संपविण्याची अट

गोव्यात ३ ते १७ मार्च शिमगोत्सव, रात्री १0 वाजता मिरवणूक संपविण्याची अट

googlenewsNext

पणजी : राज्यात ३ ते १७ मार्च या कालावधीत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत. बुधवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी बैठक घेऊन यासंबंधी आढावा घेतला. राजधानी शहरातील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग बदलून मिरामार सर्कल ते दोनापॉल असा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. रात्री १0 वाजता मिरवणूक संपविण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे बजावण्यात आले आहे. 

बैठकीत पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल, पोलिस, पालिका, महापालिकेचे प्रतिनिधी, शिमगोत्सव समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाग घेऊ इच्छिणाºया रोमटामेळ व चित्ररथ मंडळांनी संबंधित समित्यांकडे आठ दिवस आधी अर्ज सादर करावेत. वेळेत मिरवणूक सुरु करुन रात्री १0 च्या आत संपवावी, अशी अट आहे. रोमटामेळ दुपारी ४ वाजता आणि चित्ररथ सायंकाळी किमान ६ वाजता सुरु करावेत, असे बजावण्यात आले आहे. वाहनांवरील मोठ्या चित्ररथांना दिवसा वाहतुकीस मनाई आहे. एकतर रात्रीच्यावेळी किंवा बोरी पुलावरुन त्यांनी वाहतूक करावी, असे निर्देश दिलेले आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक नृत्य, गोव्याची संस्कृती प्रदर्शित केली जाईल. रोमटामेळ, चित्ररथ तसेच अन्य स्पर्धांसाठीही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणी समित्यांनी केली.

राजधानी शहरातील शिमगोत्सव मिरवणुकीच्या मार्गाबाबत पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानिक समिती आणि पोलिसांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, सांगितले आहे त्यानुसार आज मार्ग निश्चित होईल. 

 

शिमगोत्सव मिरवणुका

३ मार्च - फोंडा              ९ मार्च - डिचोली        १५ मार्च - कु डचडें

४ मार्च - मडगांव           १0 मार्च - पणजी         १६ मार्च - कुंकळ्ळी

५ मार्च - वास्को            ११ मार्च - म्हापसा        १७ मार्च - धारबांदोडा 

६ मार्च - सांगे               १२ मार्च - पेडणे

७ मार्च - साखळी          १३ मार्च - काणकोण

८ मार्च - वाळपई           १४ मार्च - केपें

Web Title: Shimagotsav, 3 to 17 March in Goa;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा