३१ जानेवारीला चंद्र होणार लाल, २० वर्षांनी दुर्मीळ योग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 09:47 PM2018-01-15T21:47:17+5:302018-01-15T21:47:58+5:30

नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल.

The moon will go on January 31, 20 years after the rare Yoga | ३१ जानेवारीला चंद्र होणार लाल, २० वर्षांनी दुर्मीळ योग

३१ जानेवारीला चंद्र होणार लाल, २० वर्षांनी दुर्मीळ योग

Next

पणजी - नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल. या दिवसाचा चंद्र हा लालसर रंगाचा असेल आणि एकाचवेळी लालचंद्र, खग्रास चंद्रग्रहण आणि ‘लाल चंद्र’  असा संगम साधणारा दुर्मिळ योग २० वर्षांनी एकदा येत असून खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना ही पर्वणी आहे. 
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रांगेत येतात आणि पृत्थवी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा खगोलशास्त्राच्या नियमानुसार चंद्रग्रहण होते. ३१ रोजी या चंत्रग्रहणाबरोबरच आणखी काही गोष्टी जुळून आल्या आहेत. चंद्र हा प्रृथ्वीच्या कक्षेतून फिरताना पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झाले तर हा लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांकडून याला ‘स्नो ब्ल्यु सुपर रायझिंग, कॉपर टोटल लूनर एक्लीप्स’ असे लांबलचक नाव देण्यात आले आहे. फ्रँड्स आॅफ आॅस्ट्रोनोमीचे(गोवा) अधघ्यक्ष सतीश नाईक यांनी विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
बहुतेक चंद्रग्रहणे ही खंडग्रास  स्वरूपाची असतात, त्यामुळे या औचित्यावर होणारे हे खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोलशास्त्राचे अभ्यासक सोडणार नाहीत अणि लोकांनाही ते पाहाण्याची उत्सुकता असेल हे स्पष्ट आहे. हे ग्रहण भारतातून पूर्णपणे दिसणार नाही. भारतातून ते अर्धेच दिसणार आहे. सकाळी ६. २१ वाजता चंद्र पृथ्विच्या पॅन्युम्रा छायेत प्रवेश करणार असल्यामुळे ग्रहणाला सुरूवात होणार आहे. नंतर ६.५० वाजता चंद्र पूर्णपणे गडद उंब्रा छायेत पोहोचणार आणि नंतर ९.३० वाजता ग्रहण पूर्णपणे सुटणार आहे. फ्रँड्स आॅफ अस्ट्रोनोमीतर्फे हे ग्रहण टेलिस्कोपमधून पाहण्याची संधी संस्थेच्या मडगाव येथील  रवींद्र भवनात, साखळी व वास्को आणि पणजीतील आॅब्सरवेटरीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रग्रहणाची खग्रास स्थिती केवळ प्रशांत महासागरातून दिसणार आहे.  

चंद्र लाल का?
सूर्याच्या प्रकाशाने चकाकणारा चंद्र आपल्याला आता दिसतो तसा ३१ रोजी न दिसता तो लालसर दिसणार आहे. सूर्याची कीरणे पृथ्वीद्वारे अडविली गेल्यामुळे पृथ्वीची छाया ही चंद्रावर पडणार आहे. परंत त्या छायेच्या बाजूला पडणाºया किरणे संधिप्रकाशीत होऊन चंद्रावर पडणार असल्यामुळे पृथ्वीवरून पाहाताना चंद्र लाल दिसणार आहे. गोव्यातून हा लाल चंद्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. 

सूपरमून व ब्ल्यू मून
जानेवारी ते मार्च हे तीन महिने हे खगोलशास्त्रज्ञांसाठी फार महत्त्वाचे वाटतात. जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येते तर फेब्रुवारीत एकदाही पौर्णिमा नाही. एका महिन्यात दोनवेळा पूर्ण चंद्र दिसला, म्हणजे पौर्णिमा आली तर त्याला पाश्चात्य लोक ब्लुमून असे पारंपरिकपणे संबोधतात. तसेच चंद्र पृथ्वीच्या जवळ पोहोचलेला असताना आलेल्या पौर्णिमेला सुपरमून असे संबोधतात.

Web Title: The moon will go on January 31, 20 years after the rare Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.