खाण आंदोलक पणजीत धडकले, मांडवी पुलांवरील वाहतूक रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 02:21 PM2018-03-19T14:21:40+5:302018-03-19T14:21:40+5:30

गोव्यातील खनिज खाण व्यवसायिक, ट्रक मालक, मशिनरीधारक आणि अन्य खाण अवलंबित मिळून खाणग्रस्त भागातील हजारो नागरिकांनी सोमवारी पणजीत धडक दिली.

Mining activist protested on mandavi bridge in goa | खाण आंदोलक पणजीत धडकले, मांडवी पुलांवरील वाहतूक रोखली

खाण आंदोलक पणजीत धडकले, मांडवी पुलांवरील वाहतूक रोखली

googlenewsNext

पणजी- गोव्यातील खनिज खाण व्यवसायिक, ट्रक मालक, मशिनरीधारक आणि अन्य खाण अवलंबित मिळून खाणग्रस्त भागातील हजारो नागरिकांनी सोमवारी पणजीत धडक दिली. गेल्या दि. 16 पासून बंद झालेल्या खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन हे खाण अवलंबित गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत पोहचले आहेत. त्यांनी पणजीतील दोन्ही मांडवी पुलांवरील वाहतूक रोखली आहे. आंदोलकांना सरकारची छुपी सहानुभूती असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.

गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सध्या बारावीची परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून शासकीय यंत्रणोने थोडे प्रयत्न केले. सकाळी अकरा वाजल्यापासून गोव्याच्या विविध भागांतून खाण अवलंबितांनी पणजीत येणे सुरू केले. पणजीत हजारो खाण अवलंबित जमले. पणजी बस स्थानकाकडे प्रथम ते एकत्र आले. दोन्ही मांडवी पुलांची टोके बस स्थानकाच्या परिसरात येऊन मिळतात. तिथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. तरीही हजारो खाण अवलंबितांनी पुल रोखले. पूर्ण पणजीतील वाहतूक व्यवस्था त्यामुळे कोलमडली. पोलिस यंत्रणा कोणताच उपाय मग काढू शकली नाही. पणजी बसस्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पर्वरीहून पणजीच्या दिशेने येणारी वाहतूक अडकली. त्याचप्रमाणो वास्को व मडगावहूनही पणजीत येणारी वाहतूक अडकली. मेरशीर्पयत वाहतुकीचा खोळंबा झाला. पणजीत येऊ पाहणा:या पर्यटकांनाही वाहतूक ठप्पचा प्रचंड त्रास झाला.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी आदेश दिला व गोव्यातील सर्व 88 खनिज लिजेस रद्द केली. गेल्या दि. 16 मार्चपासून गोव्यातील सर्व खनिज खाणी बंद झाल्या. खाणींचा लिलाव पुकारणो न्यायालयीन आदेशानुसार बंधनकारक आहे. तथापि, ह्या खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात म्हणून खाणपट्टय़ातील खाण अवलंबितांनी आंदोलन सुरू केले आहे. फोंडा, मुरगाव, सांगे, केपे, सत्तरी, डिचोली, सासष्टी या तालुक्यातील खाण अवलंबितांनी पणजीत येऊन पणजीतील सगळी वाहतूक वेठीस धरली. ज्यांचा आंदोलनाशी व खाणीशीही काही संबंध नाही असे लोक व वाहनधारक अकारण पणजीतील वाहतुकीत फसले. लोकांनी खाण अवलंबितांबाबत त्यामुळे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सोमवारी रात्री केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात दाखल होत आहेत. रात्री येथील एका हॉटेलात ते भाजपच्या सर्व आमदारांची बैठक घेतील. गोव्यात खनिज विकास महामंडळ स्थापन केले जावे, अशी आमदारांची मागणी आहे. मंगळवारी गडकरी हे खनिज व्यवसायिक आणि खाण धंद्यातील अन्य घटकांची बैठक घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेत आहेत.

Web Title: Mining activist protested on mandavi bridge in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा