कर्नाटकनंतर गोव्यातही घडामोडी शक्य, दहा काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:22 PM2019-07-10T18:22:29+5:302019-07-10T18:22:41+5:30

कर्नाटकमधील काँग्रेसच्या फुटीचे नाट्य गाजत असतानाच आता गोव्यातही काँग्रेस पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

In Karnataka, after 10 years, in Karnataka, 10 Congress MLAs are in touch with BJP | कर्नाटकनंतर गोव्यातही घडामोडी शक्य, दहा काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात

कर्नाटकनंतर गोव्यातही घडामोडी शक्य, दहा काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात

Next

पणजी : कर्नाटकमधील काँग्रेसच्या फुटीचे नाट्य गाजत असतानाच आता गोव्यातही काँग्रेस पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या आमदारांमध्ये कधीही फुट पडू शकते अशी स्थिती बुधवारी सायंकाळी आली आहे.

काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसकडे एकूण पंधरा आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसचे दहा आमदार पक्षातून बाहेर आले तर मग त्यांना आमदारकीचे राजीनामे देण्याची गरज पडणार नाही. दहा आमदारांचा गट भाजपामध्ये विलीन करावा, असाही विचार काँग्रेसच्या आमदारांनी चालवला आहे. भाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व रवी नाईक असे पाच आमदार वगळता अन्य दहाही आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्यास तयार झाले असल्याची माहिती मिळते. भाजपाच्या कोअर टीमचीही स्वतंत्रपणे बैठक पार पडली. त्यावेळी काँग्रेसच्या दहा आमदारांच्या नियोजित रणनीतीविषयी चर्चा झाली. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपप्रणीत आघाडीचे सरकार अधिकारावर आहे, पण घटक पक्ष व अपक्षांचे दबावाचे राजकारण भाजपाला नको आहे. भाजपाचे स्वत:चे 17 आमदार आहेत. मगो पक्षातून दोन आणि काँग्रेसमधून तिघांना आणून भाजपने आमदारांची संख्या सतरापर्यंत नेली. मात्र बहुमतासाठी एकवीस आमदारांचे संख्याबळ गरजेचे असते. विद्यमान आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आणि अपक्ष दोघे आमदार आहेत. हे पाचही बिगरभाजप नेते मंत्रिमंडळात आहेत. आघाडी सरकारमध्ये अधूनमधून अनेक कुरबुरी सुरू असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील दहा आमदारांना काँग्रेसपासून वेगळे करावे असे ठरले. काँग्रेसकडे मग पाचच आमदार उरतील व विरोधी पक्ष म्हणून या पक्षाचे बळही नगण्य होईल.

Web Title: In Karnataka, after 10 years, in Karnataka, 10 Congress MLAs are in touch with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा