गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीसाठी निघालेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ न्युझीलंडच्या बंदरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 06:46 PM2017-11-29T18:46:12+5:302017-11-29T18:46:27+5:30

‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेल्या नौदलाच्या ६ महिला अधिकारी आज न्युझीलंडच्या लिट्टेलटॉन बंदरात पोचल्या. आठ महिन्यात जगभ्रमंती पूर्ण होईल, असा विश्वास या बोटीवरील चमूचे नेतृत्त्व करणा-या लेफ्टनंट कमांडर वर्टिका जोशी यांनी व्यक्त केला.

INS Dharani, which went on air rush for Goa from September last year, was in New Zealand | गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीसाठी निघालेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ न्युझीलंडच्या बंदरात दाखल

गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीसाठी निघालेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ न्युझीलंडच्या बंदरात दाखल

Next

पणजी : ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेल्या नौदलाच्या ६ महिला अधिकारी आज न्युझीलंडच्या लिट्टेलटॉन बंदरात पोचल्या. आठ महिन्यात जगभ्रमंती पूर्ण होईल, असा विश्वास या बोटीवरील चमूचे नेतृत्त्व करणा-या लेफ्टनंट कमांडर वर्टिका जोशी यांनी व्यक्त केला.
आॅस्ट्रेलियाचे फ्रेमेंटल बंदर घेतल्यानंतर ही बोट पुढे निघाली आणि आज न्युझीलंडच्या बंदरात पोहोचली. यानंतर फॉकलँड्स येथील पोर्ट स्ट्रनली व दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन ही बंदरे हे अधिकारी घेतील. १२ डिसेंबर रोजी ही बोट न्युझीलंडहून पुढील प्रवासासाठी निघणार आहे.
समुद्रमार्गे जगभ्रमंतीवर निघालेल्या या महिला अधिकारी दैनंदिन तत्त्वावर समुद्रातील हवामान, लाटा याविषयी भारतीय हवामान वेधशाळेला माहिती पुरवित असतात. हवामानाचा वेध घेण्यास यामुळे खात्याला मदत होणार आहे. खोल समुद्रातील प्रदूषणाबाबतही या अधिकारी निरीक्षणातून माहिती संकलित करीत आहेत.
१0 सप्टेंबर रोजी गोव्यातील ‘आयएनएस मांडवी’ तळावरुन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या बोटीला बावटा दाखवून परिक्रमेचा शुभारंभ केला होता. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत. हा संपूर्ण प्रवास २१,६00 सागरी मैल अंतराचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी १६५ दिवस लागणार आहेत. हा जगप्रवास पूर्ण करुन एप्रिल २0१८ मध्ये हे पथक गोव्यात परतणार आहे. या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे. जेमतेम १0 मिटरच्या या बोटीमध्ये सहाजणांचा वावर या परिक्रमेत राहणार आहे.
या जगप्रवासासाठी महिला अधिका-यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी ‘आयएनएसव्ही तारीणी’ आणि ‘आयएनएसव्ही म्हादई’ या बोटींवरुन २0 हजार सागरी मैलांचा प्रवास केलेला आहे. यात मॉरिशस आणि गोवा ते केप टाउन जलप्रवासाचा यात समावेश आहे. २0१६-२0१७ मध्ये या मोहिमा झालेल्या आहेत.
‘आयएनएसव्ही म्हादई’ वरुन कॅप्टन (निवृत्त) दिलीप दांडे यांनी एकट्याने पहिली १९ आॅगस्ट २00९ ते १९ मे २0१0 अशी सागरी परिक्रमा केली. त्यानंतर कमांडर अभिलाष टॉमी यांनी १ नोव्हेंबर २0१२ ते ३१ मार्च २0१३ या काळात असाच जगप्रवास केला होता.
दरम्यान, ‘आयएनएसव्ही तारीणी’ ही बोट न्युझिलँडच्या बंदरात दाखल होताच भारतीय नौदलातर्फे ट्विटरवर त्याची माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना अत्यंत आनंद झाल्याचे नमूद करुन महिला अधिका-यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: INS Dharani, which went on air rush for Goa from September last year, was in New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा