Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

By काशिराम म्हांबरे | Published: April 30, 2024 02:39 PM2024-04-30T14:39:45+5:302024-04-30T14:41:07+5:30

Goa Crime News: माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे. 

Goa: Three arrested in kidnapping, robbery case from Sawantwadi, performance of Kolwal police | Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

- काशिराम म्हांबरे  
म्हापसा - माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे. 
निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार  या संबंधीची तक्रार सोमवार २९ रोजी कोलवाळ पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आली होती. तक्रारीत हितेश जांगीड ( कल्याणपूर राजस्थान) याचे रविवारी २८ रोजी थिवी येथून तिघा अज्ञातांनी अपहरण केले होते. अपहरणानंतर त्याच्यावर जड वस्तूचा वापर करून हल्ला करण्यात आलेला. त्यात तो जखमी झाला होता. मारहाणीनंतर त्याला जिवंत मारण्याची धमकी देण्यात आलेली. त्याच्याजवळ असलेला मोबाईल फोन, सोन्याची अंगठी तसेच रोखड ५ हजार रुपये लुटून नंतर संशयित फरार झाले होते.  

केलेली तक्रार नोंद करून घेत राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून तपास कार्य सुरु करण्यात आले. या पथकाने केलेल्या तपासा दरम्यान सर्व संशयित सावंतवाडीत असल्याची  माहिती त्यांनी उपलब्ध झाली. त्यांना अटक करण्यासाठी हे पथक सावंतवाडीला रवाना झाले. तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना सर्वांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितात बलवीरसिंग गुर्जर ( वय ३३, राजस्थान), राजकुमार चौधरी ( वय ३३, राजस्थान) तसेच वीरेंद्र सुमार ( वय ५९, पश्चिम दिल्ली) यांचा समावेश होतो. सर्वांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून गुन्ह्यासाठी वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Goa: Three arrested in kidnapping, robbery case from Sawantwadi, performance of Kolwal police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.