पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकार घेणार पोर्तुगालची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:47 PM2018-09-26T12:47:27+5:302018-09-26T12:49:45+5:30

पाणी पुरवठा आणि सांडपाणी निचरा व्यवस्था यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पोर्तुगाल सरकारची मदत घेणार आहे.

Goa to replicate Portugal water, sanitation model | पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकार घेणार पोर्तुगालची मदत

पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकार घेणार पोर्तुगालची मदत

googlenewsNext

पणजी : पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचरा व्यवस्था यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पोर्तुगाल सरकारची मदत घेणार आहे. यासाठी लवकरच पोर्तुगाल सरकारबरोबर समझोता करार केला जाणार असून या दोन्ही व्यवस्थेसाठी पोर्तुगाल मॉडेल अंमलात येणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राज्याचे मुख्य  सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने अलीकडेच पोर्तुगालला भेट देऊन तेथील सांडपाणी प्रक्रिया तसेच पाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. पोर्तुगालचे पर्यावरणमंत्री जुआंव पेद्रू द मातोस फर्नांडिस हे पुढील दोन दिवसात गोव्यात येणार आहेत.  

विजेची समस्या निर्माण झाल्यास अनेकदा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो यावर एनआयटीने पर्यायी तंत्रज्ञान सुचविणारा प्रस्ताव बांधकाम खात्याला पाठवला असल्याची माहिती  पार्सेकर यांनी दिली. वीज नसतानाही जलशुद्धीकरण प्रकल्प चालू ठेवता येईल. पर्यायी वीज व्यवस्था वापरुन प्रकल्प चालू ठेवता येईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्वयंचलित बनणे काळाची गरज आहे. यामुळे मनुष्यबळही कमी लागेल आणि दर्जाही मिळेल, असे पार्सेकर म्हणाले.

सध्या मडगांव आणि फोंड्यात २४ तास पाण्याची सोय आहे, असा दावा करताना पार्सेकर म्हणाले की, राज्यभर २४ तास पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे ऑडिटिंग केले जात आहे. पाण्याची चोरी रोखण्यासाठी २0२२ पर्यंत सर्वत्र डिजिटल मीटर बसविले जातील. सुमारे ३ लाख घरांना मीटर बसवावे लागणार असून आतापर्यंत ९0 हजार घरांना मीटर बसविण्यात आलेले आहेत. पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने हे काम केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 
 

Web Title: Goa to replicate Portugal water, sanitation model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.