गोवा खाण घोटाळा - इम्रान खानने पुढे केली धर्माची ढाल, न्यायालयाकडून आक्षेप व तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 08:49 PM2017-11-25T20:49:30+5:302017-11-25T20:49:40+5:30

Goa mining scam | गोवा खाण घोटाळा - इम्रान खानने पुढे केली धर्माची ढाल, न्यायालयाकडून आक्षेप व तंबी

गोवा खाण घोटाळा - इम्रान खानने पुढे केली धर्माची ढाल, न्यायालयाकडून आक्षेप व तंबी

Next

पणजी- कोट्यवधी रुपयांच्या खनिज चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला बेकायदेशीर ट्रेडर इम्रान खानला आता आपला धर्म आठवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आपला बचाव करताना त्याच्या वकिलाकडून आपण अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा युक्तिवाद केला. परंतु खंडपीठाने त्याच्या या दाव्याला जोरदार अक्षेप घेताना कडक समज दिली. 

कोणत्याही प्राधिकारणाकडून कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दाखला न घेता बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन आणि निर्यात करून सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या इम्रान खानने आता संरक्षणासाठी आपल्या धर्माची ढाल पुढे करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खानला सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटीने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना त्याच्या वकिलाकडून हा दावा करण्यात अला. इम्रानने कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. एसआयटीला हवी असलेली सर्व माहिती त्याने दिलेली असताना केवळ अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळेच त्याला  एसआयटीकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला.  याला एसआयटीचे वकील संतोष रिवणकर यांनी जोरदार अक्षेप घेतलाच, शिवाय न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनीही कडक आाक्षेप घेऊन समज दिली. या प्रकरणाशी असंबंधीत मुद्दे न्यायालयात उपस्थित न करण्याचा इशाराही देण्यात आला. 

कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात एसआयटीने चौकशीचे पाश आवळल्यामुळे या प्रकरणात अडकलेल्या ट्रेडर्सची, खाण मालक आणि काही खाण अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे. एसआयटीकडून अटक करण्यात आलेल्या सर्व ट्रेडरपैकी इम्रान खान हा सर्वात मोठी लूट करणारा ठरला. त्याच्या बँकेत १०० कोटीहून अधिक रुपयांच्या कायम ठेवीही एसआयटीला आढळल्या आणि त्यातील ७० कोटी रुपयांच्या ठेवी एसआयटीकडून गोठविण्यातही आल्या आहेत. 

अटक करण्यात आल्यानंतर इम्रान खानला पणजी सत्र न्यायालयाकडून केवळ दोन दिवसात सुटका करण्यात आली. याच गुन्ह्यासाठी अटक करण्यात आलेला पिटर जेकब याला २३ दिवस तुरुंगात रहावे लागले होते. कांचा गौंडरला १९ दिवस तर खाण अधिकारी रामनाथ  शेटगावकर यांना ५ दिवस तुरूंगात रहवे लागले होते. परंतु सर्वात अधिक कारनामे करण्याचा ठपका असलेला तसेच अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या इम्रानला मात्र केवळ २ दिवसांनीच जामीनवर सोडण्यात आले होते. तसेच त्यांच्या भावांनाही अटकपूर्व जामीन अर्जानंतर अंतरिम जामीन देण्यात अला. असे असतानाही धर्माची ढाल पुढे करण्याची हरकत इम्रानतर्फे करण्यात आली.
 

Web Title: Goa mining scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.