Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:16 PM2024-04-10T13:16:00+5:302024-04-10T13:16:22+5:30

Ram Mandir: रामजन्मभूमी मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्रभोजनी शुक्रवारी (दि. १९ एप्रिल)  संध्याकाळी ६ वाजता इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे 'राम जन्मभूमी मंदिर बांधणे' या विषयावर संवाद साधणार आहेत. आयसीजीने आयोजित केलेला हा कार्यक्रम विनामूल्य तसेच लोकांसाठी खुला आहे.

Goa: Girish Sahasrabhojani will unveil the details of Ramjanmabhoomi temple construction | Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग   

Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग   

पणजी  - रामजन्मभूमी मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्रभोजनी शुक्रवारी (दि. १९ एप्रिल)  संध्याकाळी ६ वाजता इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे 'राम जन्मभूमी मंदिर बांधणे' या विषयावर संवाद साधणार आहेत. आयसीजीने आयोजित केलेला हा कार्यक्रम विनामूल्य तसेच लोकांसाठी खुला आहे.

याबाबत आयसीजीने दिलेल्या माहितीनुसार,  मंदिराच्या बांधकाम कामात अनेक आव्हाने होती. यामध्ये मंदिराची रचना करणे आणि आदर्श बांधकाम साहित्य निवडणे यांचा समावेश होता. आठ एकर जागेवर बांधले जाणारे हे मंदिर नागारा वास्तुशैलीचे अनुकरण करत असून त्याला ३९२ स्तंभ आहेत. मंदिर परिसरात एकूण सात मंदिरे आहेत.

सहस्रभोजनी यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बे येथून स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मूळचे नागपूरचे असलेले सहस्रभोजनी १९९३ पासून गोव्यात राहतात आणि त्यांना स्वतःला गोयंकार म्हणवायला आवडते. आपल्या भाषणात ते राममंदिर बांधकामाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत.

Web Title: Goa: Girish Sahasrabhojani will unveil the details of Ramjanmabhoomi temple construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.