मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 05:03 PM2019-06-08T17:03:46+5:302019-06-08T17:07:53+5:30

शनिवारी दुपारी गोव्याच्या दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून धावपट्टीवर आग लागण्याची घटना घडली.

Goa Airport closed temporarily for a few hours in view of fire caused by a drop tank of MiG 29K | मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा

मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा

Next

 वास्को (गोवा) -  आज दुपारी गोव्याच्या दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून धावपट्टीवर आग लागण्याची घटना घडली. ह्या घटनेमुळे धावपट्टीची नुकसानी झालेली असून, घटनेनंतर विविध ठिकाण्यावरून दाबोळी विमानतळावर येणार असलेली विमाने मुंबई व बंगळूरु विमानतळावर वळवण्यात आली.

दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. नेहमी प्रमाणे भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ‘मीग’ लढाऊ विमानाने दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर अचानक ह्या विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून तिचा स्फोट होऊन येथे भयंकर आग लागली. ह्या टाकीत तेलाचा साठा भरलेला असल्याची माहीती सूत्रांनी देऊन आग लागल्यानंतर परिसरात भयंकर अशा धुराचे लोण पसरल्याने सुरवातीला ह्या भागात नागरीकात भीतीचे वातावरण पसरले. सदर घटना घडताच दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षा यंत्रणांनी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन येथे लागलेली आगे विझवण्याच्या कामाला सुरवात केली. लागलेली आग विझवून येथे निर्माण झालेला धोका दूर झाल्याची सुरक्षा यंत्रणांनी नंतर पूर्णपणे खात्री करून घेतली. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता नौदलाच्या लढाऊ विमानाची तेलाची टाकी कोसळल्याने धावपट्टीची काही प्रमाणात नुकसानी झाल्याची माहीती त्यांनी दिली.




ह्या घटनेनंतर दाबोळी विमानतळावर देशातील विविध भागातून येणार असलेली विमाने सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई तसेच बंगळूर विमानतळावर वळवण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली. घटनेनंतर दाबोळी विमानतळावरून विविध भागात जाणार असलेली सहा विमाने सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणापासून रोखण्यात आली. घटनेनंतर निर्माण झालेला सर्वप्रकारचा धोका दूर झाल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतर दुपारी ३ नंतर ह्या ६ विमानांनी आपल्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशासहीत येथून उड्डाण घेतल्याची माहीती संचलाक मलिक यांनी दिली. घटनेमुळे धावपट्टीच्या झालेल्या नुकसानीच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी माहितीत पुढे कळविले.

संध्याकाळी ३.४५ च्या सुमारास दाबोळी विमानतळावरील विमानाच्या पूर्ण सेवा सुरळीत झाल्यानंतर दुस-या विमानतळावर वळवण्यात आलेली विमाने गोव्याच्या दाबोळी विमानतळावर येण्यास सुरू झाल्याचे संचालक मलिक यांनी माहीतीत पुढे कळविले. उड्डाण घेत असलेल्या नौदलाच्या ‘मीग’ विमानाची टाकी कशी कोसळली याबाबत विमानतळ संचालक मलिक यांना विचारले असता याबाबत नौदलाचे संबंधित अधिकारीच योग्य रित्या माहीती देऊ शकत असल्याचे सांगून हा एके प्रकारचा अपघात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी गोव्यातील नौदलाच्या संबंधित अधिका-याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Goa Airport closed temporarily for a few hours in view of fire caused by a drop tank of MiG 29K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.