मासेमारीचा शाैक जीवावर बेतला: गोव्यात ३० वर्षीय कामगाराचा वीजेच्या झटक्याने मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Published: March 13, 2024 07:39 PM2024-03-13T19:39:19+5:302024-03-13T19:41:11+5:30

सहा मित्रासोबत तळयात 'इलेक्ट्रोफिशिंग' पद्धतीने करत होता मासेमारी

Fisherman killed: 30-year-old worker dies of electrocution in Goa | मासेमारीचा शाैक जीवावर बेतला: गोव्यात ३० वर्षीय कामगाराचा वीजेच्या झटक्याने मृत्यू

मासेमारीचा शाैक जीवावर बेतला: गोव्यात ३० वर्षीय कामगाराचा वीजेच्या झटक्याने मृत्यू

सूरज नाईक पवार, लोकमत न्युजनेटवर्क, मडगाव: मासेमारीचा शौक एका ३० वर्षीय कामगाराच्या जीवावर बेतला. शंकर केरकट्टा असे मयताचे नाव आहे गोव्यातील सासष्टीच्या चांदर येथे वरील घटना मंगळवारी घडली.तळयात मित्रासमंवेत तो मासेमारीसाठी उत्तरला असता, वीजेचा झटका त्याला बसला. या जोरदार झटक्याने तो मृत पावला. मयत मूळ झारखंड राज्यातील आहे. तो चांदर येथे भाडयाच्या घरात रहात होता. आपल्या अन्य सहा मित्रासंमवेत भाडयाच्या घराशेजारी असलेल्या तळयात इलेक्ट्रोफिशिंग पध्दतीने मासे पकडण्यासाठी उतरला होता. त्याला अचानक वीजेचा जोरदार झटका बसला. यात तो मृत पावला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मायणा कुडतरी पाेलिसांनी त्वरीत तेथे धाव घेतली. संतोष याला लागलीच येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Fisherman killed: 30-year-old worker dies of electrocution in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.