परराज्यांतून गोव्यात मासळीची आयात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 01:09 PM2018-08-04T13:09:00+5:302018-08-04T13:09:59+5:30

पंधरा दिवसांच्या बंदीनंतर शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेपासून गोव्यात परराज्यांमधून मासळीची आयात सुरू झाली.

Fisheries imports in Goa from outside state | परराज्यांतून गोव्यात मासळीची आयात सुरू

परराज्यांतून गोव्यात मासळीची आयात सुरू

Next

पणजी : पंधरा दिवसांच्या बंदीनंतर शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेपासून गोव्यात परराज्यांमधून मासळीची आयात सुरू झाली. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका-यांच्या पथकाने राज्याच्या सीमेवर मासळीची तपासणी केली व मगच वाहने गोव्यात सोडली, असे सरकारचे म्हणणे आहे. गोव्यात येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन या घातक रसायनाचा वापर झालेला असू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सीमेवर मासळीचे नमूने घेऊन ते तपासले जात आहेत. यापूर्वी परराज्यांतून येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन असते अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाल्यानंतर सरकारने मासळीची आयात थांबवली होती. 18 जुलैपासून आयात बंद होती.

यामुळे गोव्याच्या मासळी बाजारपेठाही ओस पडल्या होत्या. मासळीशिवाय गोमंतकीय माणूस राहू शकत नाही पण फॉर्मेलिन असेल तर मासळी खाणार नाही असे गोमंतकीयांनी ठरवूनच टाकले होते. मासळीच्या बाजारात लोक जास्त संख्येने जातही नव्हते. स्थानिक मासळी जुलैमध्ये फारच थोडय़ा प्रमाणात उपलब्ध झाली. गोव्यात दि. 31 जुलैर्पयत मासेमारी बंदी असते. त्यामुळेही बाजारपेठेवर परिणाम झाला होता. दि. 1 ऑगस्टपासून जरी मासेमारी सुरू झाली तरी, अजुनही गोव्यातील ट्रॉलर्स समुद्रात गेलेल्या नाहीत. कारण ट्रॉलरवर काम करणारे कामगार अजून आलेले नाहीत.

परराज्यांतील मासळीची तपासणी करावी व मगच वाहने गोव्यात सोडावीत असे आरोग्य खात्याने व मच्छीमार खात्याने मिळून ठरवले. मात्र पोळे व पत्रदेवी या दोनच मार्गाद्वारे गोव्यातून मासळीची वाहने येतील असे सरकारने जाहीर केले व त्यानुसार व्यवस्था केली. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्याकडेच अन्न व औषध प्रशासन खाते आहे. या खात्याचे अधिकारी व पोलिस यंत्रणा व वाहतूक अधिकारी यांनी मिळून राज्याच्या सीमेवर मासळीची वाहने अडवून मासळीची तपासणी करणो शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे सुरू केले. मंत्री राणो यांनी लोकमतला सांगितले, की पत्रदेवी मार्गे महाराष्ट्रातील वाहने आली. मासळी घेऊन शेवटचे वाहन शनिवारी पहाटे 3. 20 वाजता आले. पोळे तपास नाक्यावरून कर्नाटकमधील एकूण चौदा वाहने गोव्यात आली. 3.4क् वाजता शेवटचे वाहन पोळे येथून आले. मध्यरात्रीपासून पहारा सुरू झाला होता. मासळीचे ट्रक थांबवून तिथेच अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका:यांनी मासळीची तपासणी केली. कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन आढळले नाही.

Web Title: Fisheries imports in Goa from outside state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.