विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:23 PM2018-10-15T19:23:39+5:302018-10-15T19:23:49+5:30

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे.

Do not immerse the assembly; Give a chance for the establishment, the Congress will request the President | विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

Next

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. काँग्रेसला संधी दिल्याशिवाय विधानसभा विसर्जित करु नये, अशी विनंती पक्षाने केली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना याबाबतीत आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते, अशी भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा पक्षाचा दावा असून सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची या पत्रावर सही असून ते म्हणतात की, ह्यराज्यात प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामुळे जनता मात्र भरडली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. या सरकारने लोकांचा तसेच सभागृहाचाही विश्वास गमावला असून हे सरकार अल्पमतात आले आहे.ह्ण
चोडणकर यांचे असेही म्हणणे आहे की, १६ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असून विधानसभेत कोणत्याही क्षणी बहुमत सिध्द करु शकतो. राज्यपालांकडेही याआधी पक्षाने राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करणारी निवेदने दिलेली आहेत.ह्ण
कोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित केली जाऊ नये, अशी मागणी करताना तसे निर्देश राष्ट्रपतींनी राज्यपालांना द्यावेत आणि मार्गदर्शनही करावे. कट कारस्थान करुन विधानसभा विसर्जनाची चाल खेळली जाऊ शकते. याआधी पर्रीकर मुख्यमंत्री असताना अशीच चाल खेळून त्यांनी विधानसभा विसर्जन करुन घेतलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. घटनेचा कोणत्याही प्रकारे उपमर्द करु देऊ नका. अशी चाल झाल्यास ती मोडून काढा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
काँग्रेसने याआधी राज्यपालांना चार निवेदने दिली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे पक्षाने आता थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Do not immerse the assembly; Give a chance for the establishment, the Congress will request the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.