गोव्यात कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 08:41 PM2018-01-15T20:41:51+5:302018-01-15T20:41:55+5:30

गोवा - दाबोळी विमानतळावर १२ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे ४६२ ग्राम (लहान सोन्याचे तुकडे) सोने कस्टम अधिका-यांनी कारवाई करून पकडण्यात आले. 

Customs department seized gold at Dabolia airport in Goa | गोव्यात कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर सोने जप्त

गोव्यात कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर सोने जप्त

Next

वास्को : गोव्यातील दाबोळी विमानतळावर १२ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे ४६२ ग्राम (लहान सोन्याचे तुकडे) सोने कस्टम अधिका-यांनी कारवाई करून पकडण्यात आले.  चालू वर्षातील कस्टम विभागाकडून दुसरी कारवाई़ दाबोळी विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी केलेल्या एका कारवाईत एअर इंडियाच्या ( एआय - ९९४) विमानातून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याने आपल्याकडे काही नसल्याचे सांगून कारवाई करण्यास मज्जाव करू लागला. त्यामुळे कस्टम अधिका-यांचा या इसमावरील संशय बळावला. त्यांनी त्याला ग्रीन रूममध्ये नेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या गुप्त भागात त्याने लपवून ठेवलेल्या ८ सोन्याच्या कांड्या स्क्रीनवरती दिसल्या़ कस्टम अधिका-यांनी मग कांड्या त्यांच्या उपाय योजनेनुसार बाहेर काढल्या. अशा प्रकारे कस्टमच्या अधिका-यांना सदर तस्करीचे सोने पकडले़ सदर प्रवासी दुबईमार्गे गोव्यातून बेंगलोरकडे जात होता.
गोवा कस्टम सहाय्यक आयुक्त जी़बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली़ असून कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनखाली कस्टम अधिकारी पुढील तपास करीत आहे. 

 

Web Title: Customs department seized gold at Dabolia airport in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा