विरोधीपक्षनेत्याच्या घरून चालतो मटका जुगार, क्राईमब्रँचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 08:39 PM2017-09-20T20:39:36+5:302017-09-20T20:39:51+5:30

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविलेले कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात  मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या स्लीप्स सापडल्या.

Crowdbrand Claim | विरोधीपक्षनेत्याच्या घरून चालतो मटका जुगार, क्राईमब्रँचा दावा

विरोधीपक्षनेत्याच्या घरून चालतो मटका जुगार, क्राईमब्रँचा दावा

Next

पणजी, दि. 20 : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविलेले कॉंग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात  मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या स्लीप्स सापडल्या. त्या ठिकाणावरून मटका जुगाराची सूत्रे हलविली जात असल्याचा एसीबीच्या तपासाचा निष्कर्श आहे. 

कवळेकर यांच्या निवासस्थानी क्राईम ब्रँचच्या पथकाला मोठ्या प्रमाणावर मटका जुगाराच्या स्लीपी सापडल्या. मटका एजंटना पुरविल्या जाणाºया त्या स्लीपी असल्यामुळे तेथूनच या स्लीपी मटका एजंटना पुरविल्या जात असल्याच्या निष्कर्शावर पोलीस पोहोचले आहेत. केवळ मटका स्लीपीच नव्हे तर त्या ठिकाणाहून बराच कर्मचारी वर्ग काम करीत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. विशेषत: काणकोण व केपे तालक्यात होणारा मटका व्यवहार तेथूनच हाताळला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

क्राईम ब्रँचचे निरीक्षक विश्वेश कर्पेयांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात पोसिांनी बरेच पुरावे मिळविले आहेत. मटका स्लीप आणि इतर साहित्या जप्त करण्यात आले असल्याची माहिती क्राईम ब्रॅ्रंचचे अधीक्षक कार्तिक कश्यपयांनी दिली. 

एसीबीमुळे कळले
भ्रष्टाचार विरोधी विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनिवारी कवळेकर यांच्या निवास्थानी छापा टाकला होता. त्यावेळी एसीबीला जे काही सापडले त्यात मटका बुकीची स्लीप्सही आढळल्या होत्या. एसीबीने याची माहिती क्राईम ब्रँचला दिल्यामुळे क्राईम ब्रँचने बुधवारी धडक कारवाई करून या स्लीपी जप्त केल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानंतर मटका प्रकरणात क्राईम ब्रँचला तपास करण्याची सूचना करण्यात आली होती. या प्रकरणात क्राईम ब्रँचचा तपास सुरू आहे. 

चौकशीला बोलावणार
या घटनेनंतर बाबू कवळेकर यांच्या विरोधात मटका प्रकरणात वेगळा गुन्हा नोंदविला जाणार नाही, परंतु या अगोदरच नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे अधिक्षक कार्तीक कश्यप यांनी दिली. या दोन दिवसात त्यांना समन्स बजावून चौकशीला बोलावण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Crowdbrand Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा