मंत्री बाबूश मोन्सेरातकडून हनुमान मंदिराची साफसफाई, इतर मंत्री आमदारांकडू्नही आपआपल्या मतदारसंघातील मंदिरांची साफसफाई सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:55 PM2024-01-17T13:55:52+5:302024-01-17T13:56:08+5:30

यावेळी त्यांच्यासोबत पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक व नगर पालिकेचे नगसेवक व इतर सदस्य उपस्थित होते. मंदिर समितीतर्फे त्यांना श्रीरामाचा फोटो भेट देण्यात आला.

Cleaning of Hanuman temple by Minister Babush Monserrat, cleaning of temples in their respective constituencies by other ministers and MLAs also started | मंत्री बाबूश मोन्सेरातकडून हनुमान मंदिराची साफसफाई, इतर मंत्री आमदारांकडू्नही आपआपल्या मतदारसंघातील मंदिरांची साफसफाई सुरु

मंत्री बाबूश मोन्सेरातकडून हनुमान मंदिराची साफसफाई, इतर मंत्री आमदारांकडू्नही आपआपल्या मतदारसंघातील मंदिरांची साफसफाई सुरु

नारायण गावस - 

पणजी: पणजीचे आमदार तसेच महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मिरामार येथील हनुमान मंदिरामध्ये साफसफाईचे काम केले. यावेळी त्यांच्यासोबत पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक व नगर पालिकेचे नगसेवक व इतर सदस्य उपस्थित होते. मंदिर समितीतर्फे त्यांना श्रीरामाचा फोटो भेट देण्यात आला.

अयाेध्येत २२ राेजी हाेणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनानिमित्त देशभर भाजपच्या नेत्यांकडून मंदिरामध्ये साफसफाईचे काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये साफसफाईचे काम केल्यानंतर सर्व केंद्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांनी साफसफाईचे काम सुरु केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच आराेग्य मंत्री विश्वजीत राणे, पर्यटन मंत्री राेहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात तसेच इतर काही मंत्री आमदारांनी व राजकीय नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघातील मंदिरामध्ये साफसफाईचे काम केले जात आहे.

मंदिरामध्ये साफसफाईचे काम करताना खूप चांगले वाटले तसेच चांगला अनुभव आला आम्ही मंदिरामध्ये साफसफाईच्या कामासोबत मंदिर समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. तसेच मंदिराला ज्या आवश्यक सुविधा पाहिजे त्या त्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले, असे मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले.
 

 

 

Web Title: Cleaning of Hanuman temple by Minister Babush Monserrat, cleaning of temples in their respective constituencies by other ministers and MLAs also started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.